पोलिस बंदोबस्तात पैसे वाटतो…निवडणुकीत आमदार नारायण कुचेंकडून पैसेवाटप? कथित रेकॉर्डिंग व्हायरल..

भाजप आमदार नारायण कुचे यांची निवडणुकीत पैसे वाटपाच्या संवादाची कथित ऑडिओ क्लिप सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतं आहे.

Untitle (6)

Mla Narayan Kuche : राज्यात महापालिका निवडणुका पार पडल्या. या निवडणुकीच्या काळात अनेक ठिकाणी पैशांचा पाऊसच पडल्याचं चित्र दिसून आलं. या निवडणुकीसाठी अनेक दिग्गज नेत्यांनी आपली प्रतिष्ठा पणाला लावल्याचंही पाहायला मिळालं. अशातच आता भाजपचे आमदार नारायण कुचे (Mla Narayan Kuche ) आणि एका व्यक्तीची कथित ऑडिओ रेकॉर्डिंग सध्या चांगलीच व्हायरल होतं. या रेकॉर्डिंगमध्ये पोलिस बंदोबस्तात पैसे वाटतो, असा एका व्यक्तीकडून आमदार कुचेंना सल्ला देण्यात आलायं. त्यामुळे एकच खळबळ उडालीयं. या ऑडिओ क्लिपबद्दल लेट्सअप मराठी पुष्टी करीत नाही.

पिकनिकला ते माझ्याशिवाय जाऊ शकत नाही; अमृता फडणवीसांचा संजय राऊतांना अप्रत्यक्ष टोला

या ऑडिओ रेकॉर्डिंगमध्ये पैसे वाटपाच्या विषयावरुन आमदार नारायण कुचे आणि एका अज्ञात व्यक्तीचा संवाद होत आहे. यामध्ये एक व्यक्ती आमदार कुचेंना थोडासा अंधार पडू द्या त्यानंतर पैसे वाटप करतो, आमदारच दिवसाढवळ्या पैसे वाटप करत असेल तर काय करायचं असा संवाद एक अज्ञात व्यक्ती आणि आमदार नारायण कुचे यांच्यामध्ये सुरु आहे.

काळ भैरवनाथ देवस्थानामधील अन्नछत्रालयातील तेलासाठी नरेंद्र फिरोदिया यांच्याकडून मदत

छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजपचे आमदार नारायण कुचे यांची कथित ऑडिओ क्लिप व्हायरल होतं आहे. पोलिस बंदोबस्तात पैसे वाटप करत असल्याचं कथित ऑडिओ क्लिपमध्ये रेकॉर्ड झाले आहे. साहेब, अंधार पडू द्या मग पैसे वाटप करु असा आमदार कुचेंना एका व्यक्तीचा सल्ला देत असल्याचं ऐकायला मिळत आहे. त्यावर बोलताना कुचे म्हणाले, गोरगरीब लोकांचे भलं होऊ द्या, त्यावर अज्ञात व्यक्ती म्हणतो, थोडं थांबा पौलिस बंदोबस्तात पैसे वाटतो, असं उत्तर संबंधित व्यक्ती देत आहे.

follow us