‘माझ्या पद्धतीने बँकेत यावं लागेल’; भाजप आमदार कुचेंची बँक मॅनेजरला शिवीगाळ

‘माझ्या पद्धतीने बँकेत यावं लागेल’; भाजप आमदार कुचेंची बँक मॅनेजरला शिवीगाळ

MLA Narayan Kuche : जालन्यातील बदनापूरचे भाजप आमदार नारायण कुचे (MLA Narayan Kuche) यांनी एका बँक मॅनेजरला फोनवरून शिवीगाळ तसेच धमकी दिल्याचा प्रकार समोर आला आहे. सध्या या प्रकरणाची व्हाईस रेकॉर्डिंग सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. ललित शिर्लेकर (Lalit Shirlekar) असं या बँक मॅनेजरचं नाव आहे.

आमदार कुचे यांनी एका शेतकऱ्याचे थकीत कर्ज प्रकरण निकाली काढण्यासाठी बँक मॅनेजरला शिवीगाळ करून धमकी दिली असल्याची माहिती समोर आली आहे. ऑडिओ क्लिप (Audio Clip) व्हायरल झाल्यानंतर या प्रकरणी आता बँक कर्मचारी संघटनेने जालना जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांकडे तक्रार केली आहे.

नेमकं प्रकरण काय?

जालना जिल्ह्यातील जामखेड येथील युनियन बँकेचे मॅनेजरला आमदार नारायण कुचे या भाजपच्या आमदारांनी फोन केला. एका शेतकऱ्याच्या थकीत कर्ज प्रकरणात त्यांनी बँक अधिकाऱ्यावर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला. या संभाषणाची क्लिप गेल्या तीन दिवसांपासून व्हायरल होत आहे.

माळेगावच्या निवडणुकीत ज्या लोकांनी अजित पवार गटाला मतदान केलं त्यांना…, खासदार सुळेंची पहिली प्रतिक्रिया

‘तुम्हाला एवढी मस्ती असेल तर नीट करायला मी लय पक्काय. एवढा माज .. एफडी वाल्याला त्रास ..ग्राहक सेवा केंद्र द्यायचं त्याला त्रास आहे का तुमचा ‘ मी चांगल्या भाषेत तुम्हाला समजून सांगितलं . नाही ऐकलं तर हाताने समजावून सांगतो अशी धमकीही कुचे यांनी युनियन बँकेचे मॅनेजर ललित शिर्लेकर यांना दिली.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube