VIDEO : ‘तुला सोडणार नाही…’ संदीप क्षीरसागर यांचा नायब तहसीलदारांना दम, कथित ऑडिओ क्लिप व्हायरल

Sandeep Kshirsagar Audio Clip Threatening Deputy Tahsildar Viral : बीडमध्ये रोज गुन्हेगारीची नवी प्रकरणं समोर येत आहेत. त्यामुळे तेथील कायदा अन् सुव्यवस्थेवर प्रश्न उपस्थित होतोय. बीडमधून (Beed) पुन्हा एक धक्कादायक बातमी समोर आलीय. बीडचे शरद पवार (Sharad Pawar) गटाचे आमदार संदीप क्षीरसागर यांची (Sandeep Kshirsagar Audio Clip) एक कथित ऑडिओ क्लिप व्हायरल झालीय. परंतु लेट्सअप मराठी या ऑडिओ क्लिपची पुष्टी करत नाही. संदीप क्षीरसागर यांनी थेट नायब तहसीलदारालाच धमकी दिल्याचं समोर आलंय.
आमदार संदीप क्षीरसागर यांनी नायब तहसीलदाराला धमकी देतानाची कथित ऑडिओ क्लिप ही सोशल मीडियावर वेगात व्हायरल होतेय. या कथित ऑडिओ क्लिपमध्ये आमदार संदीप क्षीरसागर यांनी बीडच्या नायब तहसीलदारांना धमकावलं, असा आरोप करण्यात आलंय. बीडचे नायब तहसीलदार सुरेंद्र डोके यांना धमकावल्याची माहिती मिळतेय. आमदार क्षीरसागर यांनी डोके यांना धमकावलं की, ग्राम रोजगार सेवकाबद्दल तक्रार करु नको. संबंधित ऑडिओ क्लिप 023 ची असल्याची माहिती मिळत आहे.
आता जेजुरी देवस्थानातही ड्रेस कोड! फाटक्या जीन्स, बरमुडा, शॉर्ट, स्कर्ट पेहराव करणाऱ्यांना मज्जाव…
संदीप क्षीरसागर यांच्या या कथित ऑडिओ क्लिपमधील संभाषण खूपच धक्कादायक आहे. सहा महिन्यात सरकार आल्यानंतर तु महाराष्ट्रामध्ये कुठेही असला तरी तुला सोडणार नाही. कुठेही गेला तरी, तुझी नाटकं मीच बघेन. तू महाराष्ट्राच्या बाहेर तरी जाणार नाही ना? असं धक्कादायक वक्तव्य संदीप क्षीरसागर यांनी केलं असल्याचं या कथित ऑडिओ क्लिपमध्ये जाणवतंय.
परंतु खरंच हा आवाज संदीप क्षीरसागर यांचा आहे का? ही कथित ऑडिओ क्लिप कितपत खरी आहे, यासंदर्भात दावा करता येत नाही. परंतु सोशल मीडियावर ही ऑडिओ क्लिप वेगाने फिरतेय. नायब तहसीलदारांना आमदार साहेब थेट धमकीच देत असल्याचं ऐकायला मिळत आहे. तुम्ही माझ्या मतदारसंघाचा चार्ज मला न विचारताच घेतला. माझ्या मतदारसंघामध्ये तमाशा करू नका. तुम्हाला सांगतोय, अशी धमकी आमदार क्षीरसागर यांनी दिल्याचं ऐकायला मिळतंय.