आता जेजुरी देवस्थानातही ड्रेस कोड! फाटक्या जीन्स, बरमुडा, शॉर्ट, स्कर्ट पेहराव करणाऱ्यांना मज्जाव…

Jejuri Temple Trust Announced Dress Kode In Khanderaya Temple : जेजुरीतून भाविकांसाठी (Jejuri Temple Trust) मोठी बातमी समोर आलीय. आजपासून देवस्थानामध्ये ड्रेस कोड लागू करण्याचा निर्णय मंदिर प्रशासनाने घेतला आहे. महाराष्ट्राचे कुलदैवत म्हणून जेजुरीच्या खंडोबा देवाकडे पाहिलं जातं. जेजुरी गडावर नेहमीच भाविकांची मोठी गर्दी (Khanderaya Temple) असते. दरम्यान भाविकांसाठी देवस्थान ट्रस्टने एक नियमावली जाहीर केलीय. ही नियमावली मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांच्या वस्त्र संहितेबद्दल आहे.
देवस्थान ट्रस्टच्या नियमावलीनुसार यापुढे मंदिरामध्ये दर्शनासाठी जाताना भारतीय वेशभूषा परिधान (Jejuri Temple Dress Code) करणं, आवश्यक आहे. भारतीय वेशभूषा असेल तरच जेजुरीच्या मंदिरात भाविकांना प्रवेश मिळेल, असा नियम लागू करण्यात आलाय. पुरूष आणि महिला भाविकांना तोडक्या कपड्यांमध्ये मंदिरात प्रवेश मिळणार नाही, असा नियम आजपासून लावण्यात आलाय.
फॅशन म्हणून फाटक्या जीन्स, बरमुडा, शॉर्ट, स्कर्ट असे कपडे घालून देवदर्शनासाठी येण्यास मज्जाव केला जाणार आहे. गुडघ्याच्या वरती असणारे किंवा तोडके कपडे घालणाऱ्यांवर देखील प्रवेश बंदी असणार आहे. सर्व विश्वस्त मंडळाच्या वतीने हे नियम पाळण्याचं आवाहन भाविकांना करण्यात आलंय.
दरम्यान जेजुरीचं खंडेराय महाराष्ट्राचं आराध्य दैवत आहेत. या मंदिरामध्ये भाविकांची बाराही महिने गर्दी पाहायला मिळते. चंपाषष्ठीला याठिकाणी भाविकांचा मोठा सागर लोटतो. कारण पाषष्ठीच्या दिवशी कुलधर्म असल्याचं सांगितलं जातंय. यामुळे भाविक श्रद्धेने देवास्थानामध्ये खंडेरायाचं दर्शन घेतात. यामध्येच आता महिला आणि पुरुष यांना सारखे काही नियम लावण्यात आलेत. त्या नियमांचं पालन करण्याचं आवाहन देवस्थान ट्रस्ट आणि विश्वस्त मंडळाच्या वतीने करण्यात आलंय.