Jejuri trusteeship controversy : …तेव्हा आले, आता विश्वस्तपदाचा वाद सोडवायला का नाही? पडळकरांचा शरद पवारांना सवाल

Jejuri trusteeship controversy : …तेव्हा आले, आता विश्वस्तपदाचा वाद सोडवायला का नाही? पडळकरांचा शरद पवारांना सवाल

Gopichand Padalkar On Sharad Pawar : अखंड महाराष्ट्राचे दैवत असलेल्या खंडेरायाचा गड. पण हाच जेजुरी ( Jejuri ) गड सध्या वादाच्या आणि चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे. याचं कारण ठरलयं ते मार्तंड देवस्थान विश्वस्त समितीवरील ( Trust) विश्वस्त निवडीचा वाद. या विश्वस्त निवडीच्या विरोधात जेजुरीकर प्रचंड आक्रमक झाले असून शुक्रवारपासून रस्त्यावर उतरले आहेत. रास्ता रोको, चक्रीय उपोषण अशी आंदोलनं ( March ) सुरु आहेत. आता महाराष्ट्राच्या विधानभवनावरही हे वादळ धडकणार आहेत. (Gopichand Padalkar criticizes Sharad Pawar Jejuri trusteeship controversy )

जेजुरी विश्वस्तपदाचा तिढा सुटेना; जेजुरी ग्रामस्थांच्या शिष्टमंडळांने घेतली राज ठाकरेंची भे

दरम्यान त्यावरून आता भाजप आमदार गोपीचंद पडळकर ( Gopichand Padalkar ) यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार ( Sharad Pawar ) यांच्यावर टीका केली आहे. पडळकर म्हणाले की, ‘गेल्या वर्षी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती दिवशी शरद पवारांनी मस्ती केली. यावर्षी शरद पवार का नाही आले? जेजुरी देवस्थानमध्ये अहिल्यादेवी होळकरांचा पुतळा बसवला. जेजुरी संस्थान आणि शरद पवारांचा काही संबंध नाही. जेजुरी संस्थान हे होळकरांची जागीरदारी आहे. जेजुरी संस्थान येथील अहिल्याबाई होळकर यांचे पुतळ्याचे उद्घाटन शरद पवार यांच्या हस्ते होणार अशी पत्रिका आली. त्याच वेळी मला कळले होते. काही तरी मोठा गेम चालू आहे. मात्र पहाटे तरुणांना सांगून पुतळ्याचे मी उद्घाटन केले. सांगलीतही तेच केले?’ अशी टीका गोपीचंद पडळकर यांनी शरद पवारांवर केली आहे.

Letsupp Special : विश्वस्तपद, आंदोलन अन् वाद; जेजुरीची ग्राउंड रिअ‍ॅलिटी नेमकी काय?

पुढे ते असं देखील म्हणाले की, गेल्या वर्षी त्यांना आपली चौंडी काढून घ्यायची होती त्यामुळे तुमच्या परिवर्तनाचे केंद्र असणारे चौंडी जागृत ठेवली पाहिजे. रोहित पवार हे जयंतीच्या दिवशी प्रसाद वाटत होते. रोहित पवार यांचा उल्लेख माकडा असा करत धनगरांच्या घरी वर्षाला पाच बोकड कापतात तुला माहिती नाही का, तुम्ही आता आयुष्यभर प्रसाद वाटायच्या कामाला आहात, असा खडा सवाल पडळकर यांनी उपस्थित केला.पडळकर हे सोलापुरच्या मंद्रूपमधील धनगर समाजाच्या बैठकीत ते बोलत होते. त्यावेळी त्यांनी ही टीका केली.

जेजुरी विश्वस्त निवडीचं प्रकरण नेमक काय?

मार्तंड देवस्थान विश्वस्त समितीवरील विश्वस्तांच्या यापूर्वी नेमणुका 2017 साली झाल्या होत्या. डिसेंबर 2022 मध्ये सर्वांची मुदत संपली. त्यानंतर नुकतचं विश्वस्तपदावर नव्याने 7 जणांची निवड करण्यात आली आहे. नवीन विश्वस्तांच्या पदांसाठी सुमारे साडेतीनशे अर्ज आले होते. त्यांच्या मुलाखती घेण्यात आल्या. त्यानंतर पुणे सहधर्मदाय कार्यालयाचे सहआयुक्त सुधीर कुमार बुक्के यांनी सात जणांची निवड जाहीर केली.

याच घोषणेनंतर वादाला सुरुवात झाली आहे. जेजुरीकर प्रचंड आक्रमक झाले आहेत. पदभार स्विकारण्यासाठी आलेल्या विश्वस्तांच्या विरोधात स्थानिकांनी जोरदार घोषणा दिल्या. मोर्चे, आंदोलनांना सुरुवात झाली. या विश्वस्त निवडीत राजकीय हस्तक्षेप झाल्याचा आरोप स्थानिकांचा आहे. 7 विश्वस्तांपैकी 5 जण बाहेरचे आहेत. तसेच हे सर्व जण एका राजकीय पक्षाशी संबंधित आहेत. यातून जेजुरीतील सेवेकरी, सामाजिक कार्यकर्ते, नागरिक यांना डावण्यात आलं आहे, असा दावा स्थानिकांचा आहे. त्यावरुन नाराजीचा सूर उमटला आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube