जेजुरी विश्वस्तपदाचा तिढा सुटेना; जेजुरी ग्रामस्थांच्या शिष्टमंडळांने घेतली राज ठाकरेंची भेट

जेजुरी विश्वस्तपदाचा तिढा सुटेना; जेजुरी ग्रामस्थांच्या शिष्टमंडळांने घेतली राज ठाकरेंची भेट

Delegations of Jejuri villagers met Raj Thackeray : धर्मादाय आयुक्त कार्यालयाने (Offices of the Charity Commissioner) जेजुरीच्या खंडोबा देवस्थानच्या (Khandoba Shrine of Jejuri) विश्वस्तपदी बाहेरील व्यक्तींची नियुक्ती करून स्थानिक व्यक्तींना संधी न दिल्याच्या विरोधात जेजुरीतील ग्रामस्थांनी आंदोलन सुरू केले. जोपर्यंत विश्वस्तपदासाठी जेजुरीतील स्थानिक लोकांची निवड होत नाही, तोपर्यंत आंदोलनाचा माध्यमातून तीव्र लढा उभा करण्याचा निर्धार ग्रामस्थांनी केला. अशातच आज जेजुरीच्या ग्रामस्थांच्या शिष्टमंडळांने आज मनसे प्रमुख राज ठाकरेंची (Raj Thackeray) भेट घेतली आहे.

जेजुरीच्या ग्रामस्थांच्या शिष्टमंडळांने आज राज ठाकरे यांच्या निवास्थानी भेट घेतली. यावेळी ग्रामस्थांनी विश्वस्तपदाची निवडी संदर्भात ठाकरे यांच्याशी सविस्तर चर्चा केली. ग्रामस्थ आणि राज ठाकरे यांच्यात दिड तास चर्चा झाली असून राज ठाकरेंनी विश्वस्तपदाचा तिढा सोडवण्याची ग्वाही दिल्याचं शिष्टमंडळाने सांगितलं.

ग्रामस्थ शिष्टमंडळाने या विषयी बोलतांना सांगितले की, जेजुरी बाहेरील लोकांना पारंपारिक विधी, यात्रा, जत्रा, सण यांची माहिती नसते, त्यामुळे आम्हाला बाहेरचे विश्वस्त नको, अशी आमची भूमिका आहे. जेजुरी संस्थानचा कारभार सुरूळीत चालवा यासाठी स्थानिकांचीच विश्वसपदी नियुक्त व्हावी, स्थानिक खांदेकरी – मानकऱ्यांना न्याय मिळावा यासाठी आम्ही राज ठाकरेंची भेट घेतली. या तिढा सोडवून स्थानिकांना न्याय मिळवून देण्याची ग्वाही त्यांनी दिली. त्यासाठी राज ठाकरे हे ते संबंधित खात्याच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करणार आहेत. शिवाय, राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे याणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी भेट घेणार असल्याचं ग्रामस्थांनी सांगितलं.

Pune Rain : अहमदनगर, नाशिकनंतर पुण्यातही पावसाची जोरदार बॅटिंग…

महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या जेजुरीच्या खंडोबा देवस्थानच्या विश्वस्त निवडीच्या विरोधात ग्रामस्थांचे गेल्या काही दिवसांपासून आंदोलन सुरू आहे. काही दिवसांपूर्वी धर्मदाय आयुक्तांनी सात विश्वस्तांची निवड केली होती. या नेमण्यात आलेल्या विश्वस्तांपैकी पाच विश्वस हे जेजुरी बाहेरचे आहेत. त्यामुळं ग्रामस्थ आक्रमक झाले आहे. दरम्यान, आज ग्रामस्थ शिष्टमंडळाने विश्वस्तपदाचा तिढा सोडवण्यासाठी राज ठाकरेंची भेट घेतली. त्यामुळं राज ठाकरे यावर काय तोडगा काढतात, हेच पाहणं महत्वाचं आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube