Pune Rain : अहमदनगर, नाशिकनंतर पुण्यातही पावसाची जोरदार बॅटिंग…
पुणे शहरात आज पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. पुण्यातल्या विविध भागांत अचानक आलेल्या पावसामुळे वाहतूक कोंडी झाली आहे. या पावसामुळे पुण्यातल्या विविध भागांत पाणी साचल्याचं दिसून येत आहे.
संजय राऊतांचा नाशिक दौरा फेल, दिग्गज नेते शिंदे गटाच्या गोटात…..
जोरदार पावसामुळे मध्यवर्ती पुण्यासह उपनगरातील मुख्य रस्ते आणि अंतर्गत रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात पाणी साचलं आहे. गेल्या दोन ते तीन दिवसांपासून उकाड्याने नागरिक हैराण झाले होते. आजही दुपारपर्यंत ऊन्हाचा चांगलाच तडाखा होता. मात्र, दुपारनंतर अचानक पावसाने तुफान बॅटींग केली आहे.
डॉ. तात्यावर लहानेंचा राजीनामा सरकारकडून मंजूर; नव्या नियुक्तीचे आदेश
अचानक सुरु झालेल्या पावसाने नागरिकांची चांगली तारांबळ उडाली आहे. शहरात कामासाठी बाहेर पडलेल्या लोकांची धावपळ उडाली आहे. आठवडाभर शहरातील तापमान वाढले होते, दिवसरात्र उकाड्याने हैराण झालेल्या पुणेकरांना काही वेळासाठी तरी दिलासा मिळाला आहे.
बोलताना तारतम्य ठेवावं; राऊतांच्या थुंकण्यावर अजितदादांना सुनावलं
पाऊस पडण्यापूर्वी काही काळ शहरावर दहा ते तेरा किलोमीटर उंचीचे ढग तयार होते. दरम्यान, ढग दाटून आले आणि वादळीवाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. काळोख पसरला आणि ढगांच्या गडगडाटासह मुसळधार पाऊस पडला आहे.
दरम्यान, राज्यातील अऩेक भागांत आज पावसाने हजेरी लावली आहे. अहमदनगर नाशिक पुणे जिल्ह्यात आज पावसाने तुफान बॅटींग करीत उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा दिला तर दुसरीकडे शेतकरीही सुखावला.