संजय राऊतांचा नाशिक दौरा फेल, दिग्गज नेते शिंदे गटाच्या गोटात…..

संजय राऊतांचा नाशिक दौरा फेल, दिग्गज नेते शिंदे गटाच्या गोटात…..

Nashik Shivsena : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांचा नाशिक दौरा फेल झाल्याचं दिसून येत आहे. कारण ठाकरे गटाच्या 6 नगरसेवकांसह असंख्य कार्यकर्त्यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. विशेष म्हणजे संजय राऊत नाशिक दौऱ्यावर असताना हा पक्षप्रवेश झाला आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात संजय राऊतांचा हा दौरा फेल ठरल्याचं बोललं जातंय.

Odisha Train Accident : चुकीचा सिग्नल, ट्रॅक बदलला अन् 3 गाड्या धडकल्या, दुर्घटनेतील मृतांचा आकडा वाढला…

नगरसेवकांनी शिंदे गटात प्रवेश केल्याने नाशिकमध्ये ठाकरे गटाला खिंडार पडली आहे. ठाकरे गटाची ताकद नाशिक जिल्ह्यात मोठी आहे. राऊत नाशिक दौऱ्यावर पक्षबांधणीसाठी आले होते. मात्र, अचानक सर्व नगरसेवकांनी शिंदे गटाच्या शिवसेनेला पसंती देत प्रवेश केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत हा प्रवेश झाला आहे.

रेल्वेमंत्री राजीनामा द्या, तरच खालच्या अधिकाऱ्यांची.. ; रेल्वे अपघातावर अजितदादांनी सुनावलं

नाशिकमधील शिंदे गटाचे नेते भाऊ चौधरी यांच्याकडून ठाकरे गटाला धक्के पे धक्के बसत असल्याची परिस्थिती आहे. याआधीही चौधरी यांच्या नेतृत्वात अनेक कार्यकर्त्यांनी शिंदे गटात प्रवेश केला होता. आताही चौधरी यांच्या नेतृत्वात कार्यकर्त्यांचा प्रवेश होत असल्याने ठाकरे गटासाठी भाऊ चौधरी अडणचणीचे ठरत असल्याचं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही.

Mouni Roy Hot Photoshoot: नागिण फेम मौनी रॉयने लाल बिकिनीमध्ये दाखवला Bold अंदाज, फोटो व्हायरल

पक्ष प्रवेशावेळी बोलताना नगरसेवकांनी संजय राऊतांवर भाष्य करीत राऊतांच्या वाचाळ वृत्तीला कंटाळूनच आम्ही ठाकरे गट सोडण्याचा निर्णय घेतला असल्याचं वक्तव्य केलं आहे. यामध्ये सुरगाणा नगरपंचायतीचे नगराध्यक्ष भारत वाघमारे, सचिन आहेर, भगवान आहे, पुष्पाताई वाघमारे, अरुणा वाघमारे, प्रमिला वाघमारे, या सर्व नगरसेवकांसह कार्यकर्त्यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे.

राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री झाल्यानंतर शिंदे गटात ठाकरे गटातील असंख्य कार्यर्त्यांनी आपला मोर्चा शिंदे गटाकडे वळवला असल्याचं दिसून येत आहे. सत्तासंघर्षानंतर शिवसेनेत मोठी दुफळी निर्माण झाली असून एकीकडे ठाकरे गट पक्षबांधणीसाठी प्रयत्न करत असतानाच राजकीय डावपेचांमुळे ठाकरे गटाला सोडून कार्यकर्ते शिंदे गटात दाखल होत आहेत. त्यामुळे ठाकरे गटाला मोठे धक्के बसत आहेत.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube