रेल्वेमंत्री राजीनामा द्या, तरच खालच्या अधिकाऱ्यांची.. ; रेल्वे अपघातावर अजितदादांनी सुनावलं
Ajit Pawar on Odisha Train Accident : ओडिशातील बालासोर येथे रेल्वेचा भीषण अपघात (Odisha Train Accident) झाला. या घटनेवर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येत आहेत. राज्यातील विरोध पक्षाच्या नेत्यांनी मोदी सरकारच्या निष्काळजीपणाच्या कारभारावर टीका केली आहे. विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी तर रेल्वेमंत्र्यांची राजीनाम्याची मागणी केली आहे. नागपूर येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिबिरासाठी ते आले होते. यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. ओडिशातील रेल्वे अपघाताच्या घटनेवरही त्यांनी भाष्य केले.
ते म्हणाले, ओडिशामध्ये रेल्वेचा भीषण अपघात झाला. अडीचशेपेक्षा जास्त प्रवाशांचा मृत्यू झाला. शेकडो प्रवासी जखमी झाले. त्यांचा आकडी अजूनही पुढे आलेला नाही. आतापर्यंत देशात अनेक रेल्वेमंत्री होऊन गेले. लालबहादूर शास्त्री यांच्यानंतर ममता बॅनर्जी, नितीश कुमार यांच्यासह पाच मंत्र्यांनी मोठ्या अपघाताची जबाबदारी स्विकारून राजीनामे दिले. त्यामुळे आता सध्याच्या रेल्वेमंत्र्यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा दिला पाहिजे.
Odisha Train Accident : अपघाताची घटना वेदनादायी; दोषींना माफी नाही
पण, मला हे माहित आहे की राजीनामा देऊन प्रश्न सुटणार नाही. परंतु, राजीनामा दिला की खालच्या अधिकाऱ्यांची जबाबदारी वाढते. काही ठिकाणी रेल्वे रुटचे खासगीकरण करण्यात आले. तो रेल्वे खात्याचा अधिकार आहे. या अपघातात अनेक निष्पाप जीव गेले हे रेल्वे खाते आणि केंद्र सरकारचे अपयश आहे, असा आरोप पवार यांनी केला.
माजी रेल्वेमंत्र्यांना घातपाताचा संशय
माजी रेल्वेमंत्री दिनेश त्रिवेदी म्हणाले, प्रधानमंत्र्यांना या घटनेमुळे अतिशय दुःख झाले आहे. यासाठी आता उच्चस्ततरी समिती नेमली जाईल. ज्यामुळे सत्य काय आहे ते बाहेर येईल. मी फक्त इतकेच म्हणतो आहे की समितीने कोणत्याच गोष्टीकडे दुर्लक्ष करू नये. कारण, ही घटना एक षडयंत्र देखील असू शकते. कारण, या अपघाताचं टायमिंग विचित्र आहे.