Odisha Train Accident : अपघाताची घटना वेदनादायी; दोषींना माफी नाही

  • Written By: Published:
Odisha Train Accident : अपघाताची घटना वेदनादायी; दोषींना माफी नाही

Odisha Train Accident PM Modi Visit : ओडिशातील बालासोर येथे काल (दि. 2) संध्याकाळी तीन रेल्वेच्या भीषण अपघातानंतर संपूर्ण देशभरात हळहळ व्यक्त केली जात आहे. या भीषण अपघातानंतर बचाव आणि मदतकार्य युद्ध पातळीवर सुरू करण्यात आले आहे. त्यानंतर आज देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घटनास्थळी जात परिस्थितीचा पाहणी केली तसेच रूग्णालयांमध्ये भेट देत जखमींची विचारपूस केली. आत्तापर्यंत या घटनेमध्ये 288 लोकांचा मृत्यू झाला आहे. ही संख्या वाढण्याची भिती व्यक्त करण्यात येत आहे.

यावेळी मोदींनी आपल्या प्रियजनांना गमावलेल्या कुटुंबांसोबत संपूर्ण देशाची सहानुभूती असल्याचे सांगितले. जास्तीत जास्त नागरिकांचा जीव कसा वाचवला जाईल हे सरकारचे प्राधान्य असल्याचे ते म्हणाले. या घटनेत अनेक राज्यांतील प्रवाशांचे काही ना काही नुकसान झाले असून, मन अस्वस्थ करणारी ही अत्यंत वेदनादायी घटना आहे. या घटनेत जे नागरिक जखमी झाले आहेत त्यांच्या उपचारांसाठी कोणतीही कसर सोडली जाणार नाही असा विश्वास देत या संपूर्ण घटनेची सखोली चौकशी केली जाईल, तसेच ज्या व्यक्ती दोषी असतील त्यांच्यावर कारवाई केली जाईल अशी ग्वाही यावेळी मोदींनी दिली. यावेळी त्यांच्यासोबत केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव व धर्मेंद्र प्रधान हे दोघे उपस्थित होते. यानंतर त्यांनी बालेश्वर सदर रुग्णालय आणि कटक एससीबी मेडिकल कॉलेजलाही भेट देत रुग्णांची विचारपूस केली.

केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव आणि ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक हेही शनिवारी सकाळी अपघातस्थळी पोहोचले. रेल्वे मंत्री म्हणाले की, रेल्वे, एनडीआरएफ, एसडीआरएफची टीम बचाव कार्यात गुंतलेली आहे. सध्या आमचे लक्ष बचाव कार्यावर आहे. मदत आणि बचाव कार्य संपल्यानंतरच बाकीचे काम करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube