बोलताना तारतम्य ठेवावं; राऊतांच्या थुंकण्यावर अजितदादांना सुनावलं
Ajit Pawar On Sanjay Raut : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत हे काही दिवसांपूर्वी माध्यमांशी बोलताना थूंकले होते. त्यांना शिवसेनेचे संजय शिरसाट यांच्याविषयी प्रश्न विचारण्यात आला होता. यानंतर पत्रकार परिषदेत बोलताना त्यांना खासदार श्रीकांत शिंदे यांच्याविषयी प्रश्न विचारण्यात आला. यानंतरदेखील ते थुंकले. त्यामुळे आता संजय राऊतांवर चहुबाजूंनी टीका करण्यात येत आहे. यावर आता राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
अजित पवार म्हणाले की, महाराष्ट्रात संस्कृती, परंपरा आहे. आपला काही इतिहास आहे. स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांनी सुसंस्कृत महाराष्ट्र कसा असू शकतो आणि काम करु शकतो ते देशाला दाखवून दिलं आहे. मला दुसरी एक बाजू ऐकायला मिळाली की, ते म्हणाले की मला काहीतरी त्रास होत होता म्हणून तसं केलं. माझा त्यामागचा हेतू तो नव्हता असंही त्यांनी म्हटलं. पण प्रत्येकानं तारतम्य ठेवून वागावं, असे अजित पवार म्हणाले.
शिंदे साहेब आपले आभार! पहिल्यांदाच रोहित पवार असं का म्हणाले?
दरम्यान, संजय राऊत यांनी केलेल्या या कृतीमुळे त्यांच्यावर जोरदार टीका होतं आहे. शिवसेनेचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी राऊतांवर जोरदार हल्लाबोल केला. काही दिवसांमध्ये राऊत दगडं मारायला लागतील, असे म्हणत त्यांनी राऊतांना टोला लगावला आहे.
दरम्यान, या प्रकारावर विचारले असता राऊतांनी हसून उत्तर दिलं. ते म्हणाले की, थुंकण्यावर बंदी आहे का? सरकारने तसा अध्यादेश काढावा मग. माझ्या जिभेला त्रास झाला, माझ्या घरात मी होतो, माझी जीभ दाताखाली आली म्हणून मी थुंकलो, असं संजय राऊत म्हणाले. कुणाला वाटत असेल त्यांच्या नावाने थुंकलो हा त्यांचा प्रश्न आहे. काही लोकांचे नाव आले आणि जीभ दाताखाली आली, असंही त्यांनी सांगितलं