शिंदे साहेब आपले आभार! पहिल्यांदाच रोहित पवार असं का म्हणाले?
Rohit Pawar on Ram Shinde : अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीवरुन भाजप आमदार राम शिंदे आणि राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांच्यातील वाद टोकाला गेला होता. चौंडी येथील जयंतीच्या कार्यक्रमातूनच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अहमदनगरच्या नामांतराची घोषणा केला होती. त्याच दिवशी मंत्री गिरीश महाजन यांनी बारामती येथील वैद्यकीय महाविद्यालयाचे नामकरण केले होते. या विद्यालयाचे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर वैद्यकीय महाविद्यालय बारामती असे केले होते. आता या नामांतरावरुन राम शिंदे आणि रोहित पवार यांच्यात जुंपली आहे.
यावरुन आमदार राम शिंदे यांनी आमदार रोहित पवार यांच्यावर जोरदार टीका होती. ते म्हणाले की पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त महाराष्ट्र शासनाच्या वतीने ना. गिरीश महाजन यांनी बारामती वैद्यकीय महाविद्यालयाचे नामकरण करून “पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर वैद्यकीय महाविद्यालय बारामती जि.पुणे ” असे नामकरण केले या निर्णयाचे हार्दिक स्वागत.. परंतु दोन दिवस झाले तरी पण श्री क्षेत्र चोंडी येथे जयंतीच्या निमित्ताने तीन दिवस व्यस्त असलेल्या बारामतीच्या लोकप्रतिनिधींनी या निर्णयाचे अद्याप पर्यंत स्वागत का केले नसावे ….?
Odisha Train Accident: ओडिशा रेल्वे अपघातात 233 लोकांचा मृत्यू, तर 900 प्रवासी जखमी
राम शिंदे यांच्या टीकेला रोहित पवार यांनी प्रत्युत्तर दिले आहे. रोहित पवार म्हणाले की मी तीन दिवस चौंडीमध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीच्या कार्यक्रमात व्यस्त होतो, हे मान्य केल्याबद्दल राम शिंदे साहेब आपले आभार! आपण तर शासकीय कार्यक्रमाचे आयोजक असतानाही आपलं लक्ष केवळ व्यासपीठावर आणि भाषणावर असल्याने अभिवादनासाठी येणाऱ्या लोकांचे नियोजन, भोजन, स्मारकाचं सुशोभिकरण आणि इतर सेवा याकडं पूर्ण दुर्लक्ष होतं.
आमचा पगार बुडविला ! भाजपचे माजी खासदार अमर साबळेंवर गंभीर आरोप
ते पुढं म्हणाले की आम्ही मात्र राजकारण न करता तुम्ही ठेवलेल्या त्रुटी जाणवणार नाही यासाठी सर्वांनी मिळून लोकांची सेवा करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला, याचे आपणही साक्षीदार आहात. राहिला प्रश्न आपण उपस्थित केलेल्या बारामतीच्या लोकप्रतिनिधीचा…. तर मी बारामतीचा नाही तर लोकांच्या आशीर्वादाने ४२ हजार मताधिक्याने निवडून आलेला कर्जत-जामखेडचा लोकप्रतिनिधी आहे, या वस्तुस्थितीचा चार वर्षांनी तरी स्वीकार करा. माझी जन्मभूमी बारामती असली तरी कर्जत-जामखेडनेच मला लढायला शिकवलं आणि ती लढाई कशी झाली, हे आपल्याला चांगलं ठाऊक आहे.