आमचा पगार बुडविला ! भाजपचे माजी खासदार अमर साबळेंवर गंभीर आरोप

  • Written By: Published:
आमचा पगार बुडविला ! भाजपचे माजी खासदार अमर साबळेंवर गंभीर आरोप

भाजपचे माजी खासदार व पुणे शहर भाजपचे नवनियुक्त प्रभारी अमर साबळे (Amar Sabale) यांच्यावर कर्मचाऱ्यांनी पगार बुडविल्याचा आरोप केला आहे. त्यांच्या मालकीच्या कंपनीतील कर्मचाऱ्यांनीच हा गंभीर आरोप केलाय. कर्मचाऱ्यांना थकीत पगार देण्यात आलेला नाही. कर्मचाऱ्यांना पगारापोटी केवळ वीस ते टक्के रक्कम देण्यात येते. ९० टक्के कर्मचाऱ्यांना या पध्दतीनेच पगार देण्यात येतो. पगार न मिळाल्याने अनेक जण काम सोडून गेले असल्याचे आरोप माजी कर्मचाऱ्यांनी पत्रकार परिषद घेऊन केला आहे.

बीड : नाराजी नाट्य संपलं?; मुंडे बंधू-भगिनी एकत्र येण्याची परळीत पायाभरणी

साबळे यांच्या कंपनीतील माजी कर्मचारी संध्या जाधव, विशाल देशमुख, शिफा धोतेकर यांच्यासह २० कर्मचाऱ्यांनी हे आरोप केले आहेत. हे सर्वजण साबळे यांच्या ‘पढेगा भारत या ई लर्निंग कंपनीचे’ माजी कर्मचारी आहे. व्हिडिओ शूट करणे, इडिट करणे, व्हाइस ओव्हर करणे, स्कीप्ट लिहिणे अशा कामासाठी या कंपनीत कर्मचारी घेतले जातात.

साबळे यांची मुलगी वेणू साबळे ही कंपनी चालविते. या कंपनीत ज्यांनी काम केले त्यातील साधारणपणे 90% कर्मचाऱ्यांचे पूर्ण पगार कंपनीने कधीच दिलेले नाही. अनेक कर्मचाऱ्यांची थकबाकी पाच हजारांपासून पाच लाखांपर्यंत आहे. कर्मचाऱ्यांची थकबाकी ही कोटी रुपयांपर्यंत आहे, असा दावाही कर्मचाऱ्यांनी केला आहे.

2024 च्या निवडणुकीचे निकाल काय? राहुल गांधींनी केलं मोठं भाकीत

सुरुवातीचे दोन-तीन महिने पगार दिले जातात. त्यानंतर मात्र कंपनीकडे पैसे नाहीत या नावाखाली, कधी मूळ पगाराच्या 20 टक्के, 25 टक्के, 30 टक्के अशाच पद्धतीने पगार दिले जातात. शेवटी वैतागून लोक कंपनी सोडून जातात. वर्षभराने कर्मचाऱ्यांना नोटीस पाठवली जाते. तर कर्मचाऱ्यांवर खोटे आरोप करून त्यांना कामावरून काढून टाकले जाते. पुन्हा नवीन भरती केली जाते, त्यांना ही असाच अनुभव दिला जातो. कंपनीच्या एचआरसुद्धा यात सहभागी असल्याचा आरोप कर्मचाऱ्यांनी केला आहे.

आमची मागणी आमची कर्मचाऱ्यांची थकबाकी कंपनीची त्वरीत मिळावी व ती एकरकमी मिळावी. कंपनीवर आमचा विश्वास राहिलेला नाही. कारण दरवेळी ते पैसे आश्वासन देतात, तसा त्यांचा मेल आम्हाला येतो. प्रत्यक्षात पैसे दिले जात नाही. आमचे पैसे लवकर व एकरकमी द्या. पुढच्या पंधरा दिवसात कंपनीने काय तो निर्णय घ्यावा. नाहीतर आम्ही तुमच्याविरुध्द कायदेशीर आंदोलन सुरूच ठेवू, असा इशारा संध्या जाधव यांनी दिलाय.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube