2024 च्या निवडणुकीचे निकाल काय? राहुल गांधींनी केलं मोठं भाकीत

2024 च्या निवडणुकीचे निकाल काय? राहुल गांधींनी केलं मोठं भाकीत

Rahul Gandhi : देशात आता लोकसभा निवडणुकांच्या मोर्चेबांधणीला वेग आला आहे. कोणत्याही परिस्थितीत भाजपाचा पराभव करायचाच या इराद्याने विरोधी पक्ष प्लॅनिंग करत आहेत. काँग्रेससह अन्य विरोधी पक्षांनी याकामी पुढाकार घेतला आहे. उमेदवारांचीही चाचपणी केली जात आहे. अशात आता काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी खळबळजनक दावा केला आहे. ज्याची राजकीय वर्तुळात चर्चा होत आहे.

राहुल गांधी सध्या अमेरिकेत आहेत. त्यांनी वॉशिंग्टनमध्ये म्हटले की 2024 च्या लोकसभा निवडणुकीत विरोधकांची एकजूट भाजपाचा पराभव करील. लोकसभा निवडणुकांचे निकाल अत्यंत वेगळे असतील असा दावा त्यांनी केला.

‘त्या’ वादाला धार येताच गेहलोतांचा डाव! राजस्थानातील लोकांना दिलं मोठं गिफ्ट

राहुल म्हणाले, लोकसभा निवडणुकीत काँग्रेस चांगली कामगिरी करेल असे मला वाटते. लोकसभा निवडणुकीचे निकाल आश्चर्यकारक असतील. फक्त तुम्ही कॅलक्युलेट करा. आम्ही सर्व विरोधक एकत्र येऊन भाजपाचा पराभव करू. निवडणुका अजून एक वर्ष लांब आहेत. काँग्रेस विरोधी पक्षांना एकत्र आणण्यासाठी प्रयत्न करत आहे. विरोधी पक्षांबरोबर चर्चाही सुरू आहेत. जेव्हा राजकारणात आलो तेव्हा खासदारकी जाईल असे वाटले नव्हते. आता लोकांची सेवा करण्याची आणखी एक संधी मिळाली आहे, असे राहुल गांधी म्हणाले.

आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपला पराभूत करण्याच्या उद्देशाने विरोधी पक्ष प्रयत्न करत आहेत. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार पंतप्रधान पदाचा चेहरा म्हणून पुढे येण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांच्या स्वतःच्या पक्षापेक्षा राजदकडूनच त्यांना यासाठी प्रोजेक्ट करण्याचा आटोकाट प्रयत्न करत आहे. मध्यंतरी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनीही विरोधकांच्या एकतेसाठी पुढाकार घेतला होता. मात्र, काँग्रेसने त्यांना त्यांच्याच राज्यातील निवडणुकीत झटका दिल्याने बॅनर्जी यांनी पुढाकार घेण्याचा विचार सोडून दिल्याचे दिसत आहे.

‘त्या’ वादाला धार येताच गेहलोतांचा डाव! राजस्थानातील लोकांना दिलं मोठं गिफ्ट

कर्नाटकातील निवडणुकांनंतर काँग्रेसने विरोधकांच्या एकीसाठी जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत. यामध्ये काँग्रेसला कितपत यश मिळेल हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. सध्याच्या परिस्थितीत काही मोजकेच पक्ष सोडले तर बहुतांश पक्ष या मानसिकतेत नाहीत.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube