‘त्या’ वादाला धार येताच गेहलोतांचा डाव! राजस्थानातील लोकांना दिलं मोठं गिफ्ट

‘त्या’ वादाला धार येताच गेहलोतांचा डाव! राजस्थानातील लोकांना दिलं मोठं गिफ्ट

Free Electricity in Rajasthan : राजस्थानात काँग्रेस नेते सचिन पायलट (Sachin Pilot) आणि मुख्यमंत्री अशोक गेहलोत (Ashok Gehlot) यांच्यातील वाद मिटल्याचे काँग्रेस नेत्यांनी जाहीर केल्यानंतरही काल पायलट यांनी मागण्यांवर ठाम असल्याचे सांगत या वादाला नवी धार दिली. काही दिवसांपूर्वी त्यांनी जनसंघर्ष यात्रा काढत नागरिकांशी संवाद साधला होता. या घडामोडींमुळे बदलत्या जनमताचा अंदाज घेत मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी एक मोठा डाव टाकला आहे.

गेहलोत यांनी प्रति महिना 200 युनिटपर्यंत विजेचा (Free Electricity in Rajasthan) वापर असणाऱ्या ग्राहकांना पहिले 100 युनिट मोफत वीज तसेच 200 युनिटपर्यंतचे स्थायी शुल्क, फ्यूल सरचार्ज आणि अन्य शुल्क माफ केले जातील. याचे पैसे राज्य सरकार देईल, अशी घोषणा केली आहे.

राज्यात सुरू असलेली महागाई सवलत शिबिरे आणि नागरिकांशी संवाद साधल्यानंतर जो काही प्रतिसाद मिळाला त्याआधारे ही घोषणा करण्यात आली आहे. मे महिन्यातील विज बिलातील फ्यूल सरचार्जसंदर्भातही लोकांना प्रतिक्रिया दिल्या. त्यााआधारे हा निर्णय घेण्यात आला. 100 युनिटपर्यंत वीज वापरणाऱ्या ग्राहकांचे वीज बिल शून्य होईल. त्यांना कोणतेही पैसे द्यावे लागणार नाहीत.

100 युनिटपेक्षा जास्त विजेचा वापर करणाऱ्या नागरिकांनाही पहिले 100 युनिट मोफत असतील. तसेच 200 युनिटपर्यंत वीज वापर असणाऱ्या ग्राहकांना स्थायी शुल्क, फ्यूल सरचार्ज आणि अन्य प्रकारचे शुल्क माफ होतील.

वाढत्या महागाईत दिलासा देणारी बातमी; गॅसच्या दरात मोठी घट

वाद कायम राहणार ?

राजस्थान काँग्रेसमधील दोन दिग्गज नेते अशोक गेहलोत आणि सचिन पायलट यांच्यातील राजकीय वाद मिटविण्याचे प्रयत्न फेल होताना दिसत आहेत. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि राहुल गांधी यांच्या भेटीनंतर वाद मिटल्याची जी घोषणा करण्यात आली होती त्यावर पाणी पडले आहे. सचिन पायलट यांनी पहिल्यांदाच मौन तोडत स्पष्ट केले की मी मागण्यांवर ठाम आहे.

पायलट यांनी गेहलोत सरकारला याआधीच पंधरा दिवसांची मुदत दिली होती. मागण्यांवर सकारात्मक निर्णय घेतला गेला नाही तर आंदोलन करण्याचाही इशारा दिला होता. त्यानंतर आता त्यांनी पुन्हा असे वक्तव्य केल्याने आगामी काळात गेहलोत यांच्याविरोधात राजकीय लढाईचे संकेत दिले आहेत. विशेष म्हणजे, हे वक्तव्य अशा वेळी आले आहे ज्यावेळी पीएम मोदी राजस्थानात निवडणुकांची रणनिती ठरविण्यासाठी आले होते.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube