वाढत्या महागाईत दिलासा देणारी बातमी; गॅसच्या दरात मोठी घट
LPG Cylinder Price Reduce: वाढत्या महागाई्च्या ओझ्याखाली दबलेल्या सर्वसामान्यांना आता काहिसा दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. एलपीजी गॅसच्या किंमतीत मोठी घट झाली आहे. तेल कंपन्यांकडून व्यावसायिक एलपीजी गॅसच्या किंमतीत कपात करण्यात आली आहे. व्यावसायिक गॅसच्या किंमतीत 83.50 रुपयांची कपात करण्यात आली आहे. तर घरगुती गॅसचे (Domestic gas)दर जैसे थेच आहेत. घरगुती गॅसच्या दरात कोणताही बदल करण्यात आला नाही.
कर्नाटकच्या घशाला कोरड : CM शिंदेंना पत्र लिहीत महाराष्ट्राकडे मदतीची याचना
यापूर्वी 1 मे 2023 व्यावसायिक गॅसच्या किंमतीत 172 रुपयांची कपात करण्यात आली होती. आता जून महिन्यात व्यावसायिक गॅसच्या किंमतीत 83.50 रुपयांची कपात करण्यात आली आहे. आता 19 किलोच्या व्यावसायिक गॅस सिलेंडरसाठी 1773 रुपये मोजावे लागणार आहेत. यापूर्वी याच सिलेंडरसाठी 1856.50 रुपयांना मिळत होता.
नवी दिल्लीत व्यावसायिक गॅसची किंमत 83.50 रुपयांनी कमी झाली आहे. त्यासाठी 1773 रुपये मोजावे लागणार आहेत. त्याचबरोर घरगुती गॅस सिलेंडर 1103 रुपयांवर स्थीर आहे. गेल्या महिन्यात व्यावसायिक गॅस सिलेंडरचा दर 1856.50 रुपये होता. नवीन बदल झालेल्या नियमानुसार 1 जूनपासून व्यावसायिक गॅस सिलेंडर दिल्लीत 1773 रुपयांना विकला जाणार आहे, तर कोलकातामध्ये 1875.50 रुपयांना हा गॅस सिलेंडर मिळणार आहे.
मुंबईमध्ये 19 किलो व्यावसायिक गॅस सिलेंडर 1725 रुपयांना मिळणार आहे तर चेन्नईमध्ये एलपीजीची किंमत 1973 रुपये आहे. मुंबईत व्यावसायिक गॅस 1808.50 रुपयांवरुन 1725 रुपयांना मिळणार आहे. चेन्नईमध्ये एलपीजी गॅस 2021.50 वरुन 1937 रुपयांना मिळणार आहे. यामध्ये 84.50 रुपयांची घट झाली आहे.
देशातील एलपीजीचे दर महिन्याला सरकारी तेल कंपन्या ठरवत आहेत. कच्च्या इंधनाच्या जागतिक दरांवरुन तेलाच्या किंमती ठरवल्या जात आहेत. त्यामुळे दर महिन्याला तेलाच्या किंमती बदलल्या जात आहेत. कच्च्या तेलाच्या किंमतीचा थेट परिणाम एलपीजीच्या किंमतीवर होतो.