मोठी बातमी : संसदीय प्रवास सुरू करतोय, नितीश कुमार यांचं ट्विट; बिहारमध्ये खांदेपालट निश्चित

NitishKumar बिहारच्या राजकारणात खांदेपालट होण्याचे निश्चित झाले असून, मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी राज्यसभेत जाणार असल्याची घोषणा केली आहे.

  • Written By: Published:
CM Nitish Kumar Announces 35% Reservation For Bihar Women

Nitish Kumar Confirms Rajya Sabha Shift and Steps Down as Bihar CM : बिहारच्या राजकारणात खांदेपालट होण्याचे आता निश्चित झाले असून, विद्यामान मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी राज्यसभेत जाणार असल्याची अधिकृत घोषणा केली आहे. याबाबत त्यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पोस्टदेखील केली आहे. ज्यात त्यांनी संसदीय प्रवास सुरू करत असल्याचा उल्लेख केला आहे. नितीश कुमार यांच्या या पोस्टनंतर आता बिहारच्या मुख्यमंत्रीपदाची माळ कुणाच्या गळ्यात पडते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

बिहारचं राजकारण बदललं;नितीश कुमार राज्यसभेत अन् भाजपचा मुख्यमंत्री?

नितीश कुमार यांची पोस्ट काय?

नितीश कुमार यांनी एक्सवर केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, यावेळी राज्यसभेसाठी निवडणूक लढवण्याचा मानस असल्याचे नमुद केले आहे. कालपासून नितीश राज्यसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याची चर्चा  होती. मात्र, आता नितीश कुमार यांनी स्वतःच याची घोषणा केली आहे. यामुळे नितीश कुमार यांना गेल्या 21 वर्षांपासून बिहारच्या मुख्यमंत्रीपदावरून पायउतार होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. Nitish Kumar Confirms Rajya Sabha Shift and Steps Down as Bihar CM

गेल्या दोन दशकांहून अधिक काळ तुम्ही माझ्यावरचा विश्वास आणि पाठिंबा कायम ठेवला आहे आणि त्या शक्तीच्या बळावरच मी बिहारची आणि तुमच्या सर्वांची पूर्ण भक्तीने सेवा केली आहे. तुमच्या विश्वास आणि पाठिंब्यामुळेच आज बिहार विकास आणि आदराचा एक नवीन आयाम स्वीकारत आहे. यासाठी मी यापूर्वी अनेकदा तुमचे आभार मानले आहेत.

माझ्या संसदीय कारकिर्दीला सुरुवात केल्यापासून, मला बिहार विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांचा आणि संसदेच्या दोन्ही सभागृहांचा सदस्य होण्याची इच्छा होती. मी या निवडणुकीत राज्यसभेचा सदस्य होण्याचा प्रयत्न करत असल्याचे नितीश यांनी म्हटले आहे. मी तुम्हाला प्रामाणिकपणे खात्री देतो की, तुमच्याशी असलेले हे नाते भविष्यातही कायम राहील आणि विकसित बिहार उभारण्यासाठी एकत्र काम करण्याची माझी वचनबद्धता अढळ राहील. तसेच राज्यात नव्याने स्थापन होणाऱ्या सरकारला माझा पूर्ण पाठिंबा आणि मार्गदर्शन असेल असेही नितीश यांनी त्यांच्या पोस्टमध्ये नमुद केले आहे.

सहा वेळा खासदार, १० वेळा मुख्यमंत्री आणि आता राज्यसभा सदस्य

काही महिन्यांपूर्वी त्यांनी विक्रमी १० व्यांदा मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. ते सहा वेळा संसद सदस्य आणि विक्रमी १० वेळा बिहारचे मुख्यमंत्री राहिले आहेत. ते विधान परिषदेचे सदस्य आणि आमदार देखील राहिले आहेत. त्यांनी जवळजवळ दोन दशके बिहारचे मुख्यमंत्रीपद भूषवले आहे.

E20 Petrol : 1 एप्रिलपासून तुमची गाडी E20 पेट्रोलवर धावणार; नेमकं E20 काय, किती असणार किंमत?

नितीश कुमार यांचा विक्रम

१९८५ – पहिल्यांदाच आमदार झाले
१९८९ – पहिल्यांदाच खासदार झाले (सहा वेळा खासदार – लोकसभा)
१९९० – पहिल्यांदाच मंत्री झाले
२००० – पहिल्यांदाच मुख्यमंत्री (बिहार) झाले
२००६ – पहिल्यांदाच बिहार विधान परिषदेचे (एमएलसी) सदस्य झाले

नितीश कधी मुख्यमंत्री होते?

३ मार्च २००० ते १० मार्च २०००
२४ नोव्हेंबर २००५ ते २५ नोव्हेंबर २०१०
२६ नोव्हेंबर २०१० ते १९ मे २०१४
२२ फेब्रुवारी २०१५ ते १९ नोव्हेंबर
२०१५ २० नोव्हेंबर २०१५ ते २६ जुलै २०१७
२७ जुलै २०१७ ते १२ नोव्हेंबर २०२०
१६ नोव्हेंबर २०२० ते ९ ऑगस्ट २०२२
१० ऑगस्ट २०२२ ते २८ जानेवारी २०२४
ते १९ नोव्हेंबर २०२५
२० नोव्हेंबर २०२५

(टीप: जेव्हा नितीश कुमार पहिल्यांदा मुख्यमंत्री झाले तेव्हा ते समता पक्षाचे नेते होते.)

मोठी बातमी : विनोद तावडेंचा वनवास अखेर संपला; भाजपकडून राज्यसभेसाठी यादी जाहीर

नितीश कुमार यांची राजकीय प्रवास

१९८५-८९: बिहार विधानसभेचे सदस्य, पहिल्यांदाच आमदार म्हणून निवडून आले
१९८७-८८: अध्यक्ष, युवा लोक दल, बिहार
१९८९ – ९ व्या लोकसभेवर निवडून आले, पहिल्यांदाच खासदार झाले
०४/१९९०-११/१९९०: केंद्रीय कृषी आणि सहकार राज्यमंत्री
१९९१ – १० व्या लोकसभेवर पुन्हा निवडून आले (दुसरा कार्यकाळ)
१९९१-९३: सरचिटणीस – सचिव, जनता दल, संसदेत जनता दलाचे उपनेते
१९९६: ११ व्या लोकसभेवर पुन्हा निवडून आले (तिसरा कार्यकाळ)
१९९८: १२ व्या लोकसभेवर पुन्हा निवडून आले (चौथा कार्यकाळ)
१९/३/९८ – ५/८/९९: केंद्रीय कॅबिनेट मंत्री, रेल्वे
१४/४/९८ – ५/८/९९: केंद्रीय कॅबिनेट मंत्री, भूपृष्ठ वाहतूक (अतिरिक्त कार्यभार)
१९९९: पुन्हा निवडून आले १३ वी लोकसभा (पाचवी टर्म)
१३/१०/९९ – २२/११/९९ – केंद्रीय कॅबिनेट मंत्री, भूपृष्ठ वाहतूक
२२/११/९९ – ३/३/२००० – केंद्रीय कॅबिनेट मंत्री, कृषी
२७/५/०० – २०/३/०१: केंद्रीय कॅबिनेट मंत्री, कृषी
२०/३/०१- २१/७/०१: केंद्रीय कॅबिनेट मंत्री, कृषी, रेल्वेचा अतिरिक्त कार्यभार
२२/७/०१- २१/५/०४: केंद्रीय कॅबिनेट मंत्री, रेल्वे
२००४ – १४ व्या लोकसभेवर (सहावी टर्म) पुन्हा निवडून आले.

follow us