संदीप क्षीरसागर आणि अजित पवारांमध्ये गुप्त भेट, चर्चांना उधाण; अजितदादा पत्रकारांवर संतापले, ‘तुम्ही वेडे…’

  • Written By: Published:
संदीप क्षीरसागर आणि अजित पवारांमध्ये गुप्त भेट, चर्चांना उधाण; अजितदादा पत्रकारांवर संतापले, ‘तुम्ही वेडे…’

Sandeep Kshirsagar Met Ajit Pawar : सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh) यांच्या हत्या प्रकरणानंतर भाजप आमदार सुरेश धस (Suresh Dhas आणि शरद पवार गटाचे आमदार संदीप क्षीरसागर (Sandeep Kshirsagar) यांनी सातत्याने हा विषय लावून धरला होता. या दोन्ही नेत्यांकडून मंत्री धनंजय मुंडेंवर (Dhananjay Munde) जोरदार टीका करण्यात येत होती. अशातच आता आमदार संदीप क्षीरसागर यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांची (Ajit Pawar) भेट घेतली. त्यामुळं राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं.

मुंबईतील उंच इमारतीला भीषण आग; घटनेत २ जणांचा दुर्दैवी मृत्यू, तर पाचजण गंभीर जखमी 

संदीप क्षीरसागर यांनी जुन्नरला अजित पवारांची भेट घेतली. या भेटीमुळं सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या आहेत. मात्र उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अखेर माध्यमांशी संवाद साधला आणि भेटीचे कारण स्पष्ट केले. मला संदीप क्षीरसागर भेटले.  त्यांच्या शहरात पाण्याचा प्रश्न निर्माण झालाय. त्याबाबत त्यांनी माझी भेट घेतली. या भेटीत कोणताही राजकीय चर्चा झाली नाही, असं अजित पवार म्हणाले.

अजित पवार काय म्हणाले?
या भेटीबाबत विचारला अजित पवारांना विचारले असता ते संतापून म्हणाले, तुम्ही वेडे आहात. मी राज्याचा उपमुख्यमंत्री आणि बीडचा पालकमंत्री आहे. त्यामुळं संदीप क्षीरसागर जरी विरोधी पक्षाचे आमदार असले तरी ते मला भेटू शकतात.

पुढं ते म्हणाले, बीड नगरपालिकेचं वीज बिल थकलेलं आहे. त्यामुळे एका जिल्ह्याच्या ठिकाणी २१ दिवसांनी पाणीपुरवठा होतो, हे योग्य नाही. त्यामुळेच संदीप क्षीरसागर तक्रार करत होते की यातून काहीतरी मार्ग काढा. वीज बील थकलेलं आहे, ते कनेक्शन सुरू करून त्यामधून आम्हाला मार्ग काढून द्या. त्यासाठी आमदार क्षीरसागर भेटायला आले होते. यापेक्षा दुसरं काहीही नाही. शेवटी, कसं असतं, मी देखील विरोधी पक्षाचा आमदार होता. तेव्हा माझंही काही काम असेल तर मी त्या ठिकाणच्या मंत्र्यांना भेटत होतो. त्यामुळं या भेटीचा दुसरा कोणताही राजकीय अर्थ काढण्याची गरज आहे, असं अजित पवार म्हणाले.

धनंजय मुंडेंचे रक्षक मुख्यमंत्री, त्यामुळेच धसांची माघार; मनसे नेत्याचा जोरदार प्रहार 

संदीप क्षीरसागर काय म्हणाले?
ते म्हणाले, उपमुख्यमंत्री अजित पवार हे बीड जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत. आमच्या बीड नगरपालिकेचा विषय खूप गंभीर आहे. या संदर्भात मी अजित पवारांची भेट घेतली. आजही आमची योजना तयार असतांना वीज बील भरलं नाही म्हणून कनेक्शन जोडलेले नाहीत. मोठ्या प्रमाणात पाणी उपलब्ध असूनही, बीड शहराला १५ ते २० दिवसांनी पाणी मिळत आहे. मी ही समस्या अजित पवारांना सांगितली आहे. तसेच या भेटीची गुप्तता पाळलेली नाही, असं क्षीरसागर यांनी माध्यमांना सांगितले.

 

follow us
  • fb
  • instagram
  • youtube