धनंजय मुंडेंचे रक्षक मुख्यमंत्री, त्यामुळेच धसांची माघार; मनसे नेत्याचा जोरदार प्रहार

  • Written By: Published:
धनंजय मुंडेंचे रक्षक मुख्यमंत्री, त्यामुळेच धसांची माघार; मनसे नेत्याचा जोरदार प्रहार

Prakash Mahajan : संतोष देशमुख (Santosh Deshmukh) हत्याप्रकरणानंतर भाजपाचे आमदार सुरेश धस (Suresh Dhas) यांनी आरोपांची राळ उठवून मंत्री धनंजय मुंडेंना Dhananjay Munde) लक्ष्य केले होते. मात्र, धस आणि मुंडे यांच्यामध्ये दोन दिवसांपूर्वी गुप्तभेट झाल्याची माहिती बाहेर येताच राजकीय कल्लोळ निर्माण झाला. धनंजय मुंडे यांच्या डोळ्याचे ऑपरेशन झाल्यानं त्यांच्या तब्येतीची चौकशी करण्यासाठी भेट घेतल्याचं धस म्हणाले. यावर आता मनसे नेते प्रकाश महाज (Prakash Mahajan) यांनी भाष्य केलं.

नागपूरमध्ये दारुगोळा निर्मिती कंपनीत मोठा स्फोट; दोन ठार, अनेकजण जखमी, घटनेचं कारण अस्पष्ट 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना हे धनंजय मुंडेंचे रक्षक आहेत. मुख्यमंत्र्यांनी धसांना तंबी दिली असावी, त्यामुळेच त्यांनी माघार घेतली, अशी टीका महाजन यांनी केला.

प्रकाश महाजन म्हणाले की, बीड जिल्ह्यात सुरेश धस विषयी साधारण समज आहे की, असा कोणताही राजकीय नेता नाही, ज्याला धस यांनी राजकीयदृष्ट्या फसवलं नाही. बीड जिल्ह्यात दोन गट तयार होतात की काय अशा टोकावर परिस्थिती पोहोचली होती. सुरेश धस यांनी प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरित्या धनंजय आणि पंकजा यांच्यावर बरंच तोंडसुख घेतलं, असा आरोप महाजन यांनी केला.

सतेज पाटलांचा प्रदेशाध्यक्षपद स्वीकारण्यास नकार, त्यामुळेच सपकाळांना…; पृथ्वीराज चव्हाणांनी सांगितली इनसाईड स्टोरी 

विधानसभा निवडणुकीत भ्रष्टाचाराविषयी बोलून त्यांनी जनमत आपल्या बाजूने घेतलं. आता असे काय झाले होते की, धस यांना धनंजय मुंडेंची भेट घ्यावी लागली. अनेकांचा विश्वासघात सुरेश धस यांना केला आहे. पंकजा असं म्हणाल्या होत्या की, आष्टीकडे लक्ष द्यावं लागले, या भीतीपोटीच तर त्यांनी धनंजय मुंडेंची भेट घेतली नाही ना, असा सवाल महाजन यांनी उपस्थित केला.

मुंडेंचे रक्षक मुख्यमंत्री असल्याने धसांची माघार
प्रकाश महाजन यांनी पुढे बोलतांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना थेट धनंजय मुंडे यांचे रक्षक म्हटलं. ते म्हणाले की, धस यांनी बीडच्या जनतेचा विश्वासघात केला आहे. मध्यंतरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इकडे कार्यक्रमाला आले होते. त्यावेळी त्यांनी धस यांना तंबी दिली असावी. त्यामुळं धस यांनी आपले तांदूळ चार तास बावनकुळेंकडे बसून घुतले असावे. धस काही धुतल्या तांदळाचे नाहीत, असा हल्लाबोल महाजन यांनी केला.

धनंजय मुंडे, सुरेश धस आणि बजरंग सोनवणे या बीडमधील गॅंगला एकमेकांच्या गोष्टी माहिती आहेत. अजित पवार यांनी धनंजय मुंडे यांचा कोअर कमिटीमध्ये समावेश केला. त्यामुळे आता धनंजय मुंडेंचं काही होणार नाही. शिवाय, धनंजय मुंडेंचे रक्षक मुख्यमंत्री असल्याने धसांनी माघार घेतली असावी, असं महाजन म्हणाले.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube