फरार कृष्णा आंधळेची संपत्ती होणार जप्त; संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट

फरार कृष्णा आंधळेची संपत्ती होणार जप्त; संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट

Santosh Deshmukh Case : मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या (Santosh Deshmukh Case) प्रकरणाचे पडसाद अजूनही उमटत आहेत. या प्रकरणात सात आरोपींवन मोक्का लावण्यात आला आहे. वाल्मिक कराडवरही मोक्कांतर्गत कारवाई करण्यात आली आहे. या प्रकरणात वाल्मिक कराडवर (Walmik Karad) आरोप केले जात आहेत. दुसरीकडे कृष्णा आंधळे हा आरोपी (Krishna Andhale) अजूनही पोलिसांच्या हाती लागलेला नाही. आता याच कृ्ष्णा आंधळेची संपत्ती जप्त करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. बीड न्यायालयाने हे आदेश दिले आहेत.

सरपंच संतोष देशमुख यांची अतिशय निघृणपणे हत्या करण्यात आली होती. या हत्याकांडाला आता दोन महिने उलटून गेले आहेत. या प्रकरणाचा तपास पोलीस, एसआयटी आणि सीआयडी करत आहेत. तपास वेगाने सुरू असून काही आरोपींना अटक करण्यात आली आहे. मात्र कृष्णा आंधळे अजूनही फरार आहे. त्याचा ठिकठिकाणी शोध घेतला जात आहे मात्र तो काही केल्या सापडत नाही. म्हणून पोलिसांनी कृष्णा आंधळेला फरार घोषित केले आहे.

Santosh Deshmukh murder : कृष्णा आंधळेला ठार मारले असेल.. करुणा मुंडेंचा खळबळजनक आरोप

यानंतर आता कृष्णा आंधळेची कोंडी करण्याची तयारी सुरू झाली आहे. सीआयडी अधिकाऱ्यांनी कृष्णा आंधळेची संपत्ती जप्त करण्यासाठी न्यायालयात अर्ज दाखल केला होता. या अर्जावर सुनावणी होऊन कृष्णा आंधळेची संपत्ती जप्त करण्याचे आदेश न्यायालयाने दिले. आंधळेच्या नावावर पाच वाहने आहेत. धारुर आणि केज येथील बँकेत त्याचे खाते आहे. ही सर्व संपत्ती जप्त करण्यात येणार आहे.

कृष्णा आंधळेचा घातपात : करुणा मुंडे

संतोष देशमु हत्याकांडातील (Santosh Deshmukh murder case) आरोपी कृष्णा आंधळे (Krushna Andhale) अजूनही फरार आहे. 50 दिवसांहून अधिक काळ लोटला तरी कृष्णा आंधळेला पकडण्यात पोलीस, एसआयटी (SIT) आणि सीआयडी अपयशी ठरली आहे. यावर आता करुणा शर्मा-मुंडे (Karuna Sharma) यांनी भाष्य केलं. कृष्णा आंधळेचा खून झाला असावा असा संशय त्यांनी व्यक्त केला. त्यांच्या या वक्तव्याने एकच खळबळ उडाली आहे.

संतोष देशमुख हत्या प्रकरणातील फरार आरोपी कृष्णा आंधळेचा दोन महिने झाले तरी तपास लागत नाही. त्याची हत्या देखील झाली असावी. वाल्मिक कराडला (Walmik Karad) शरण यायला जर इतके दिवस लागत असतील तर कृष्णा आंधळे याला देखील मारून टाकलं असेल, असा दावा करूणा मुंडेंनी यांनी काल प्रसारमाध्यमांशी बोलताना केला होता.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube