Santosh Deshmukh murder : ‘कृष्णा आंधळेला ठार मारले असेल…’; करुणा मुंडेंचा खळबळजनक आरोप

  • Written By: Published:
Santosh Deshmukh murder : ‘कृष्णा आंधळेला ठार मारले असेल…’; करुणा मुंडेंचा खळबळजनक आरोप

Karuna Sharma : संतोष देशमु हत्याकांडातील (Santosh Deshmukh murder case) आरोपी कृष्णा आंधळे (Krushna Andhale) अजूनही फरार आहे. 50 दिवसाहून अधिक काळ लोटला तरी कृष्णा आंधळेला पकडण्यात पोलीस, एसआयटी (SIT) आणि सीआयडी अपयशी ठरली आहे. यावर आता करुणा शर्मा (Karuna Sharma) यांनी भाष्य केलं. कृष्णा आंधळेचा खून झाला असावा असा संशय त्यांनी व्यक्त केला. त्यांच्या या वक्तव्याने एकच खळबळ उडाली.

महाकुंभ मेळ्यात स्नान हा दैवी आशीर्वाद; स्वप्नील जोशी पोहचला प्रयागराजला 

करुणा मुंडे यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी अनेक विषयांवर भाष्य केलं. संतोष देशमुख हत्या प्रकऱणावर बोलतांना त्या म्हणाल्या की, संतोष देशमुख हत्या प्रकरणातील फरार आरोपी कृष्णा आंधळेचा दोन महिने झाले तरी तपास लागत नाही. त्याची हत्या देखील झाली असावी. वाल्मिक कराडला शरण यायला जर इतके दिवस लागत असतील तर कृष्णा आंधळे याला देखील मारून टाकलं असेल, असा दावा करूणा मुंडेंनी केला.

पुढं त्या म्हणाल्या, वाल्मिकचे बॅंकेत १०० बँक खाती आहेत. त्याने बँकेच्या खात्यांमधून पैसा वळवला आहे. धनंजय मुंडे यांच्याकडे आका काही कमी नाही आहेत. पुणे, संभाजीनगर आणि सांगलीत देखील आका आहेत. माझ्याकडे सर्वांचे पुरावे आहेत. धनंजय मुंडे यांच्या संदर्भात अनेक आर्थिक घोटाळ्याचीही माझ्याकडे माहिती आहे. वेळ पडली तर मी सगळी माहिती बाहेर काढेल, असा इशाराही करूणा शर्मांनी दिला.

‘छावा’ सारख्या चित्रपटाचा भाग होणे, स्वतःला मी नशीबवान समजतो ; ओंकार महाजन 

धनंजय मुंडे स्वतःला माफ करु शकतील?
करुणा मुंडे म्हणाल्या की, धनंजय मुंडेंची सवय आहे की, फुट टाका आणि राज्य करा. त्यांनी स्वत: तोंड उघडले नाही पण, माझ्या मुलाला माझ्या विरोधात उभे कले. माझा मुलगा फ्रस्टेशमध्ये होता. आमचे बरे-वाईट झाले तर हा माणूस स्वत:ला माफ करू शकणार आहे का? बापाच्या सांगण्यावरून त्याने स्टोरी टाकली. माझ्या मुलाला किती कॉल येत होते, हे सर्वांनी बघितले आहे.

..तर पंकजा मुंडेंचेही मंत्रीपद जाईल
करुणा मुंडे म्हणाल्या, तुम्ही मंत्री आहात, मी काहीच नाही. पण, मी तोंड उघडले तर केवळ धनंजय मुंडेंचेच नाही तर पंकजाताईंचेही मंत्रीपद जाऊ शकते, असा दावा त्यांनी केला.

दरम्यान, भाजप आमदार सुरेश धस यांनीही या प्रकरणावर भाष्य केलं. आका आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांची नार्कोटेस्ट करण्याची त्यांनी मागणी केली.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube