महाकुंभ मेळ्यात स्नान हा दैवी आशीर्वाद; स्वप्नील जोशी पोहचला प्रयागराजला

महाकुंभ मेळ्यात स्नान हा दैवी आशीर्वाद; स्वप्नील जोशी पोहचला प्रयागराजला

Swapnil Joshi Shahisnan in Prayagraj Mahakumbh : उत्तर प्रदेशातील प्रयागराज शहरात महाकुंभमेळा (Mahakumbh 2025) सुरू आहे. महाकुंभ मेळा भारतासह जगभरातील लोकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदु ठरतोय आणि जगभरातील भक्तांनी या महा कुंभ मेळ्यात खास हजेरी देखील लावली आहे. त्यामध्ये आता निर्माता अभिनेता स्वप्नील जोशीने जाऊन पवित्र स्नान करून आशीर्वाद घेतेले आहेत. स्वप्नील हा कायम वेगेवगळ्या देव स्थांनाना भेट देताना दिसतो.

VIDEO : मोठं संकट… शुद्ध आणि स्वच्छ हवा पाहिजे, लाईफस्टाइल कोच ल्यूक कोउटिन्होचं मुख्यमंत्र्यांना आवाहन

स्वप्नीलने त्याचा सोशल मीडिया वरून या महाकुंभ मेळ्याची खास झलक प्रेक्षकांना दाखवली आहे. त्रिवेणी संगम इथे जाऊन स्वप्नील ने खास स्नान तर केलं पण भक्तिमय वातावरणात सुरू असलेल्या या खास सोहळ्याची झलक त्याने या व्हिडिओ मधून दाखवली आहे.

>मोठी बातमी : मुंबईत ‘जीबीएस’ व्हायरसचा शिरकाव; अंधेरीला आढळला पहिला रुग्ण

स्वप्नील हा खास अनुभव शेयर करत म्हणतो “२०२५ मधला सगळ्यात अविस्मरणीय अनुभव आहे. महा कुंभ मेळ्यात उपस्थित राहून पवित्र स्नान करण्याचा योग आला खूप सकारात्मक ऊर्जा अनुभवून डोळ्यातून आपसूक आनंदअश्रू आले. या अद्भुत संगमाचे साक्षीदार होणं दैवी आशीर्वाद वाटतो” स्वप्नील कायम चर्चेत राहणारा अभिनेता असला तरी त्याची अध्यात्मिक बाजू देखील तितकीच खास आहे.

दुसरीकडे या मेळ्यातून धक्कादायक बातमी समोर आली आहे. या ठिकाणी आज पुन्हा आगीची घटना घडली. आगीची माहिती मिळताच अग्निशमन विभागाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. यानंतर आग आटोक्यात आणण्याच्या कामास सुरुवात झाली. ही घटना शंकराचार्य मार्गावरील सेक्टर 18 मध्ये घडली. या आगीत येथील अनेक तंबू जळून खाक झाले आहेत. मोठ्या परिश्रमानंतर आग नियंत्रणात आणण्यात आली.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube