VIDEO : मोठं संकट… शुद्ध आणि स्वच्छ हवा पाहिजे, लाईफस्टाइल कोच ल्यूक कोउटिन्होचं मुख्यमंत्र्यांना आवाहन

VIDEO : मोठं संकट… शुद्ध आणि स्वच्छ हवा पाहिजे, लाईफस्टाइल कोच ल्यूक कोउटिन्होचं मुख्यमंत्र्यांना आवाहन

Luke Coutinho On Clean Air In Mumbai : लाईफस्टाइल कोच कोउटिन्हो यांनी (Luke Coutinho) देशातील हवेच्या शुद्धतेवरून (Clean Air) मोठा प्रश्न उपस्थित केलाय. त्यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनाच या प्रश्नी लक्ष घालण्याची विनंती केलीय. ल्यूक कोटिन्होने म्हटलंय की, मी सामाजिक कार्यकर्ता किंवा योद्धा नाहीये. मी या देशाचा एक सामान्य नागरिक आहे. मला शुद्ध हवा मिळण्याचा अधिकार आहे. आपण दररोज बघतोय की, आपल्या सभोवतलाचे अनेक लोक विशेष करून मुंबईमधील लोक दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात आजारी पडत आहे.

त्यामुळं माझी मुख्यमंत्री, पंतप्रधान आणि बीएमसी यांना एक नम्र विनंती आहे. आम्हाला सध्या इतर कोणत्या गोष्टींची गरज नसून शुद्ध हवेची गरज आहे. त्यांनी शिक्षकांना उद्देशून म्हटलंय की, तुम्हाला विद्यार्थ्यांच्या अनुपस्थितीबद्दल माहिती नाही का, ते आजारी पडत आहेत याची कल्पना नाहीये का?

मोठी बातमी : मुंबईत ‘जीबीएस’ व्हायरसचा शिरकाव; अंधेरीला आढळला पहिला रुग्ण

हवेच्या गुणवत्तेमुळे श्वसनाच्या समस्या जाणवत आहेत. डॉक्टरांनी उद्देशून देखील त्यांनी म्हटलंय की, श्वसनाच्या आजाराचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलंय. यामध्ये जास्त प्रमाणात लहान मुलांचा समावेश आहे. फक्त अन्न आणि औषधांनी ही समस्या सुटणारी नाहीये. आपल्याला शुद्ध हवेची देखील आवश्यकता आहे. आपण सकाळी पेशंटला चालण्याचा, मोकळ्या हवेत फिरण्याचा सल्ला देत आहात. परंतु हेच जास्त हाणीकारक आहे, याचाच रूग्णाच्या प्रकृतीवर मोठा परिणाम होतोय.

 

View this post on Instagram

 

A post shared by Luke Coutinho – Official (@luke_coutinho)

याच पार्श्वभूमीवर ल्यूक यांनी डॉक्टर, शिक्षक, विद्यार्थी तसेच सेलिब्रेटी यांना एकत्र येण्याचं आवाहन केलंय. त्यांनी म्हटलंय की, आपण एकत्र येवून माणूस म्हणून आम्हाला नक्की काय हवंय, हे मुख्यमंत्र्‍यांना सांगू या. आपल्याला आपला आवाज उठवावा लागेल, असं त्यांनी आवाहन केलंय. आपल्या सर्वांना आपलं शारिरीक स्वास्थ योग्य ठेवण्याचं अधिकार आहे. आपल्यात लहान मुलं, वृद्ध व्यक्ती, पालक, नवजात शिशु आहेत. आपल्या शारिरीक स्वास्थाचं भविष्य औषधं, योग्य, आहार नाहीये.

टायगर अभी जिंदा है! “आमची वज्रमूठ” पक्षांतराच्या चर्चांवर ठाकरेंच्या खासदारांची एकी; तिघांची दांडी

रोज शुद्ध अन् स्वच्छ हवा, पाणी आणि अन्न मिळणं, ही मानवी शरिराची मुलभूत गरज आहे. मला माहित नाही, ही समस्या कशी सुटणार आहे. परंतु माझी नम्र विनंती आहे की, खूप सगळा पैसा इतर गोष्टींमध्ये खर्च होतो, त्याऐवजी आपल्या शहरातील हवा कशी शुद्ध राहील यासाठी काहितरी उपाययोजना करणं महत्वाचं आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर मला एकत्र येणाऱ्या लोकांची गरज आहे. तुम्हाला तुमचं मूल आजारी पडत असल्याचं दिसत नाहीये का, त्याचा त्रास जाणवत नाहीये का? मग एकत्र येवून आपला प्रश्न मांडा. त्या विषयावर बोला. आपण सर्वजण एकत्र आलो, तर मोठी शक्ती निर्माण होईल. तिचा नक्कीच परिणाम काहितरी वेगळा असेल, अशी सकारात्मक भूमिका ल्यूक यांनी म्हटलंय.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube