राहुल गांधींनी सर्व मर्यादांचं उल्लंघन केलं अन् …, CM फडणवीस काँग्रेसवर भडकले

Devendra Fadnavis On Rahul Gandhi : देशातील राजकारणात गेल्या काही दिवसांपासून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारा चर्चेत आहे.

  • shakir sayyad
  • Written By: Published:
Devendra Fadnavis On Rahul Gandhi

Devendra Fadnavis On Rahul Gandhi : देशातील राजकारणात गेल्या काही दिवसांपासून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारा चर्चेत आहे. एका अहवालातील धक्कादायक खुलाश्यानंतर काँग्रेससह इतर विरोधीपक्ष त्यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी आंदोलन करत आहे. आज देखील देशाची राजधाणी दिल्लीत लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या नेतृत्त्वात ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी विरोधी पक्ष मोर्चा काढत आहे. तर दुसरीकडे आता भाजपकडून देखील या मोर्च्यावर प्रत्युत्तर देण्यात येत आहे. काँग्रेस देशात अराजकता पसरवण्याचं काम करत आहे अशी टाकी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून करण्यात आली आहे. माध्यमांशी बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी राहुल गांधीसह काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला.

मुख्यमंत्री फडणवीस (Devendra Fadnavis) म्हणाले की, अनेक राज्यांनी काँग्रेसला (Congress) नाकराले आहे. बिहारमध्ये 36 वर्षांपाासून काँग्रेस सत्तेत नाही. गेल्या अनेक दशकांपासून जनतेनं काँग्रेसला नाकारलंय आहे. संविधान संपवण्याचं षडयंत्र काँग्रेसनं रचलंय. काँग्रेसला संविधान आणि लोकशाहीवर विश्वास नाही. आता काँग्रेस अराजकतेच्या मानसिकतेत पोहचलीय आहे अशी टीका नागपूर येथे माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेसवर केली आहे. तसेच काँग्रेस संविधान दाखवून संविधान संपवण्याचा काम करत असल्याचा आरोप देखील फडणवीस यांनी यावेळी केला.

तुकाराम मुंढे भीमनवारांची चौकशी करु शकत नाही; गुणरत्न सदावर्ते काय म्हणाले?-

तर दुसरीकडे त्यांनी राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्यावर देखील जोरदार हल्लाबोल केला. राहुल गांधी देशात अफवा पसरवण्याचं काम करत आहे. आज राहुल गांधींनी सर्व मर्यादांचं उल्लंघन केलं असल्याची टीका राहुल गांधी यांच्यावर केली. तसेच आम्ही देशात संविधानाची रक्षा करणार तुम्ही कितीही मोर्चे काढा असं देखील यावेळी फडणवीस म्हणाले.

follow us