इंडिया आघाडीच्या मोर्चावर फडणवीसांचा पलटवार; ‘विरोधकांना संविधानिक संस्था डिस्क्रेडिट करायच्या आहेत’

Devendra Fadnavis; इंडिया आघाडीच्या मोर्चावर प्रतिक्रिया देताना फडणवीसांनी विरोधकांवर संविधानिक संस्थांची बदनामी केल्याचा आरोप केला.

Devendra Fadnavis Reaction India Alliance March Against Gyanesh Kumar

Devendra Fadnavis Reaction India Alliance March Against Gyanesh Kumar: मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी इंडिया आघाडीतील विरोधी पक्षांनी नवी दिल्लीत ‘लोकशाही वाचवा’ मोर्चा काढला आहे. या मोर्चात विरोधी पक्षांतील सुमारे 150 खासदार आणि 19 राजकीय पक्ष सहभागी झाल्याचे सांगण्यात येत आहे. ‘वोट चोर, गद्दी छोड’च्या घोषणांसह हा मोर्चा निवडणूक आयोगाच्या कार्यालयाच्या दिशेने निघाला. मोर्चाच्या पार्श्वभूमीवर दिल्ली पोलिसांकडून मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

भाजपला ‘ज्ञानेश-जी’ नाही, भगवान गणेश मदत करत आहेत; संबित पात्र काँग्रेसवर भडकले

या मोर्चावर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “माझ्या गेल्या दोन-तीन दिवसांच्या पोस्टवरून विरोधकांचा नॅरेटिव्ह किती फोल आहे, हे लक्षात येईल. विरोधकांचा नॅरेटिव्ह फोल ठरला तरी जाणीवपूर्वक संभ्रम निर्माण केला जात आहे. विरोधकांना संविधानाने निर्माण केलेल्या संस्था डिस्क्रेडिट करायच्या आहेत. म्हणजेच संविधानिक संस्थांची विश्वासार्हता कमी करायची आहे. संविधानावरच प्रश्न निर्माण करण्याचं यांचं षडयंत्र आहे,” असे फडणवीस यांनी म्हटले आहे.

राहुल गांधी-प्रियंका गांधी आकाशवाणी भवनाच्या गेटमधून शिरले; इंडिया आघाडीचा दिल्लीत मोर्चा

दरम्यान, निवडणूक आयोगाच्या कार्यालयाकडे निघालेला मोर्चा पोलिसांनी अडवला आहे. राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांनी आकाशवाणी भवनाच्या गेटमधून निवडणूक आयोगाच्या कार्यालयाकडे जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी त्यांना रोखले. त्यानंतर राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांनी तेथेच ठिय्या मांडला आहे.

follow us