राहुल गांधी-प्रियंका गांधी आकाशवाणी भवनाच्या गेटमधून शिरले; इंडिया आघाडीचा दिल्लीत मोर्चा
Gyanesh Kumar Resignation India Alliance; निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी इंडिया आघाडीचा नवी दिल्लीत ‘लोकशाही वाचवा’ मोर्चा.
Gyanesh Kumar Resignation India Alliance: मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी इंडिया आघाडीतील विरोधी पक्षांनी नवी दिल्लीत जोरदार ‘लोकशाही वाचवा’ मोर्चा काढला आहे. या मोर्चात विरोधी पक्षांतील जवळपास 150 खासदार आणि 19 राजकीय पक्ष सहभागी झाले आहेत. ‘वोट चोर गद्दी छोड’ च्या नाऱ्यासह निवडणूक आयोगाच्या कार्यालयाच्या दिशेने हा मोर्चा निघाला असून, तो रोखण्यासाठी दिल्ली पोलिसांकडून मोठ्या प्रमाणात बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
मोर्चादरम्यान राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांनी आकाशवाणी भवनाच्या गेटमधून पुढे जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. विरोधकांकडून निवडणूक आयोगाच्या कामकाजावर आणि मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या भूमिकेवर गंभीर प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
राज ठाकरेंच्या SIR रद्द करण्याच्या मागणीला मुख्यमंत्री फडणवीसांचं उत्तर, 9 मुद्द्यांतून काय म्हणाले?
मतदार यादीतून मतदारांची नावे वगळण्यासंदर्भातील आरोप आणि निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकतेच्या मुद्द्यावरून विरोधक आक्रमक झाले आहेत. या पार्श्वभूमीवर ज्ञानेश कुमार यांनी पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी इंडिया आघाडीतील पक्षांकडून करण्यात येत आहे. मोर्चाच्या पार्श्वभूमीवर संसद परिसरासह निवडणूक आयोगाच्या कार्यालयाकडे जाणाऱ्या मार्गांवरही कडेकोट सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे.