मोठी बातमी : मुंबईत ‘जीबीएस’ व्हायरसचा शिरकाव; अंधेरीला आढळला पहिला रुग्ण
![मोठी बातमी : मुंबईत ‘जीबीएस’ व्हायरसचा शिरकाव; अंधेरीला आढळला पहिला रुग्ण मोठी बातमी : मुंबईत ‘जीबीएस’ व्हायरसचा शिरकाव; अंधेरीला आढळला पहिला रुग्ण](https://images.letsupp.com/wp-content/uploads/2025/01/Pune-GBS-Case_V_jpg--1280x720-4g.webp)
मुंबई : पुण्याच्या सिंहगड भागात आढळलेल्या जीबीएस व्हायरसचा मुंबईतही (Mumbai)) शिरकाव झाला आहे. (GBS) अंधेरी भागात जीबीएसचा पहिला रुग्ण सापडला आहे. अंधेरी पूर्वमध्ये मालपा डोंगरी परिसरात राहणाऱ्या एका पुरुषाला या व्हायरसची लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे. सध्या त्याच्यावर महापालिकेच्या सेवन हिल रुग्णालयात उपचार सुरू आहेत. (man living in Malpa Dongri area of Andheri East has been found to be infected with the GBS virus)
अंधेरी पूर्वचे आमदार मुरजी पटेल यांनीही या वृत्ताला दुजोरा दिला. पटेल यांनी रुग्णालयात जाऊन रुग्णाची भेट घेतली. त्यानंतर रुग्णालयाच्या अधिष्ठातांना जीबीएस रुग्णांचा विशेष वॉर्ड तयार करून 50 बेड राखीव ठेवण्याची सूचना केली. शिवाय या रुग्णांवर महात्मा फुले जीवनदायी योजनेअंतर्गत मोफत उपचार करण्याच्या सूचना देखील केल्या आहेत. महापालिकेच्या आरोग्य विभागाने मात्र हा रूग्ण संशयित असून पुढील चाचणी सुरु असल्याचे म्हंटले आहे.
सुनावणी सुरूच राहील…कोर्टात यायचं नसेल तर येऊ नका, मुंबई हायकोर्टाचे अक्षयच्या आई-वडिलांना निर्देश
दुर्मिळ मज्जातंतू विकार म्हणजेच अर्थात जीबीएस हा आजार संसर्गजन्य नसून तो जंतू संसर्गाच्या घटनेनंतर संसर्गोत्तर (पोस्ट इन्फेक्शन) गुंतागुंतीचा आजार मानला जातो. एकदम अधिक संख्येने या आजाराच्या नोंदी आढळल्या असल्या तरी हा आजार संसर्गजन्य नाही. एखादा जंतू संसर्ग झाल्यानंतर रोगप्रतिकार शक्ती शरीराचा बचाव करते. पण हा एक असा दुर्मिळ आजार आहे, ज्यात हीच रोगप्रतिकार शक्ती स्वतःच्याच शरीरातील मज्जासंस्थेवर हल्ला करते.
परिणामी नसांना नियमित कार्य करता येत नाहीत. त्यामुळे मेंदूच्या सूचनांचं पालन करणं स्नायूंना शक्य होत नाही, मेंदूला इतर शरीराकडून मिळणारे संकेत कमी होतात. त्या व्यक्तीच्या स्नायूंच्या हालचालींवर नियंत्रण राखणाऱ्या, वेदना, तापमान, स्पर्श या सगळ्याची जाणीव करून देणाऱ्या नसांचे कार्य कमी होते. दरम्यान, सुरवातीला या आजाराची कारणे शोधली गेली तेव्हा त्यात दूषित पाणी हे त्याचं कारण समोर आलं होतं.
ठाकरे गटात महाभूकंप! 6 खासदार करणार जय महाराष्ट्र; धक्कादायक नावांची चर्चा..
सहसा अस्वच्छता, पाणी दूषित असणे हे या आजाराला कारणीभूत ठरु शकतात. वेळीच उपचार केल्यास त्याची तीव्रता कमी करता येऊ शकते. तसेच वेळेत उपचार केल्यास 95 टक्के रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आहे. या रुग्णांच्या उपचारामध्ये शरिरातील प्लाझमा बदलणे, हिमोग्लोबिन वाढवणे व व्हेटींलेटर लावणे हे तीन उपचार करावे लागतात.
आजार टाळण्यासाठी महानगरपालिकेने नमूद केल्या महत्त्वाच्या गोष्टी
पाणी उकळून प्यावे
उघड्यावरील व शिळे अन्न खाणे टाळावे
अचानकपणे हातापायाच्या स्नायूंमध्ये अशक्तपणा जाणवल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्यावा
वैयक्तिक स्वच्छतेवर भर देण्यात यावा.
जेवण्यापूर्वी आणि शौचालय वापरल्यानंतर साबणाने आणि पाण्याने हात स्वच्छ धुवा.
संसर्गाची लक्षणे
अतिसार
पोटदुखी
ताप
अंगदुखी, अंगातील त्राण जाणे
मळमळ किंवा उलट्या