ठाकरे गटात महाभूकंप! 9 पैकी 6 खासदार करणार जय महाराष्ट्र; धक्कादायक नावांची चर्चा..

ठाकरे गटात महाभूकंप! 9 पैकी 6 खासदार करणार जय महाराष्ट्र; धक्कादायक नावांची चर्चा..

Uddhav Thackeray : राज्याच्या विधानसभा निवडणुकीत अनेकांनी पक्षांतरं केली. अनेकांचा हा प्रयोग यशस्वी ठरला मात्र असेही काही नेते होते ज्यांना पराभवाचा सामना करावा लागला. पराभवानंतर पक्षांतर केलेल्या या नेतेमंडळींत अस्वस्थता वाढू लागली आहे. या अस्वस्थतेतूनच त्यांनी पुन्हा घरवापसी करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. तर दुसरीकडे विरोधी पक्षांना गळती लागली आहे. याचा सर्वाधिक फटका ठाकरे गटाला बसत आहे. एकामागोमाग एक मोठे नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते ठाकरेंची साथ सोडत आहेत.

आताही उद्धव ठाकरेंना धक्का देणारी बातमी आली आहे. एक दोन नव्हे तर तब्बल सहा खासदार पक्षाला जय महाराष्ट्र करणार असल्याची माहिती मिळाली आहे. पक्षांतर बंदी कायद्याला हुलकावणी देण्यासाठी आवश्यक असलेली सहा खासदारांची मोट बांधण्यात एकनाथ शिंदेंना यश आले आहे. ठाकरे गटाचे सहा खासदार एकनाथ शिंदे यांच्या साथीला येणार आहेत, असे वृत्त एबीपी माझाने दिले आहे.

ठाकरेंना मोठा धक्का! शहरप्रमुखासह 35 पदाधिकाऱ्यांचा जय महाराष्ट्र; भाजपात प्रवेश?

विधानसभा निवडणुकीत दारुण पराभव झाल्यानंतर ठाकरे गटाला गळती लागली आहे. आतापर्यंत अनेक मोठ्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी पक्ष सोडला आहे. हा सिलसिला अजूनही थांबलेला नाही. आता तर शिंदेंनी ठाकरे गटाचे खासदारच फोडण्याचा चंग बांधला आहे. या राजकीय नाट्यात त्यांना यश मिळेल का हा प्रश्न आहे. मात्र शिंदे गटाकडून जोरदार प्रयत्न सुरू झाले आहेत.

उद्योग मंत्री उदय सामंत यांनी काही दिवसांपूर्वीच ठाकरे गटाला आणखी हादरे बसणार असल्याचे संकेत दिले होते. त्यानुसार आता ठाकरे गटाचे सहा खासदार शिंदे गटात प्रवेश करणार असल्याचे सांगण्यात येत आहे. लोकसभा निवडणुकीत मशाल चिन्हावर एकूण 9 खासदार निवडून आले होते. आता पक्षांतरी बंदी कायद्यानुसार कारवाई टाळायची असेल तर एकाच वेळी सहा खासदारांनी पक्षांतर करणे गरजेचे आहे. त्यानुसारच आता 9 पैकी 6 खासदार शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

उद्धव ठाकरे-भाजप पुन्हा एकत्र येणार? देवेंद्र फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं

शिंदे गटात नेमके कोणते खासदार प्रवेश करणार आहेत याची माहिती अजून समोर आलेली नाही. मात्र संसदेच्या आगामी अधिवेशनाआधीच पक्षांतर होणार असल्याची चर्चा आहे. या खासदारांचं भवितव्य पणाला लागणार होतं. त्यामुळेच ठाकरेंची साथ सोडताना अनेकांची स्थिती तळ्यात मळ्यात अशीच होती. मागील वेळी जे राजकीय नाट्य घडलं त्यात शिवसेनेचे एकूण 18 पैकी 12 खासदार शिंदे गटात गेले होते.

ठाकरेंचे नऊ खासदार कोण ?

आताच्या लोकसभा निवडणुकीत ठाकरे गटाचे संजय देशमुख, नागेश पाटील आष्टीकर, संजय जाधव, राजाभाऊ वाजे, संजय दिना पाटील, अनिल देसाई, अरविंद सावंत, भाऊसाहेब वाकचौरे आणि ओमराजे निंबाळकर हे नऊ खासदार निवडून आले आहेत. आता या नऊ खासदारांपैकी कोण ठाकरेंची साथ सोडून जाणार याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube