सुनावणी सुरूच राहील…कोर्टात यायचं नसेल तर येऊ नका, मुंबई हायकोर्टाचे अक्षयच्या आई-वडिलांना निर्देश
Badlapur Encounter Next Hearing on 24 February : बदलापूर एन्काऊंटर प्रकरणी (Badlapur Encounter) पुढील सुनावणी 24 फेब्रुवारी रोजी होणार आहे. मुंबई उच्च न्यायालयाने अशी माहिती दिलीय. याचिकाकर्त्यांनी कोर्टात यायचं नसेल तर येऊ नका, सुनावणी सुरू राहील असं देखील मुंबई हायकोर्टाने (Bombay High Court) म्हटलंय. बदलापूर एन्काऊंटर प्रकरणात दिवसेंदिवस नवे ट्विस्ट समोर येत असल्याचं पाहायला मिळतंय.
पुण्यात गळती… वसंत मोरेंसमोर मोठं आव्हान, उद्धव ठाकरेंनी सोपवली मोठी जबाबदारी
आम्हाला केस लढायची नाही…
बदलापूर एन्काऊंटर बनावट आहे, असा आरोप विरोधकांनी केलाय. अक्षय शिंदेचे (Akshay Shinde) आई-वडिल सुद्धा यासाठी न्यायाची मागणी करत होते. पण अचानक त्यांनी वेगळी भूमिका घेतल्याचं समोर आलंय. त्यामुळंच सर्वांना मोठा धक्का बसलाय. आम्हाला ही केस लढवायची नसल्याचं साकडं त्यांनी हायकोर्टाला घातलंय. आमच्यावर कोणाचाही दबाव नाही, ही धावपळ आता आम्हाला जमत नाहीये, असं त्यांनी न्यायालयासमोर सांगितलं होतं. त्याप्रकरणी आज सुनावणी पार पडली आहे, अन् या प्रकरणी सुनावणी सुरूच राहील असं देखील कोर्टाने सांगितलंय.
प्रकरणात मोठा ट्विस्ट
अक्षय शिंदेच्या आई आणि वडिलांनी कोर्टाला सांगितलं की, लोकांचं खूप टॉर्चर होतंय. धावपळ सहन होत नाही, आमचा मुलगा तर गेलाय. त्यामुळं आम्हाला ही केस लढायची नाही. ही सुनावणी न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे आणि न्यायमूर्ती नीला गोखले यांच्या खंडापीठासमोर झालीय. आपल्यावर कोणताही दबाव नाहीये, असं देखील त्यांनी यावेळी न्यायालयाला सांगितलंय. अक्षय शिंदेच्या आई आणि वडिलांच्या या भूमिकेमुळं या प्रकरणात मोठा ट्विस्ट आलाय.
संपूर्ण प्रकरण काय?
मागील वर्षी बलदापुर येथील एक नामांकित शाळेत दोन अल्पवयीन मुलींवर अत्याचार झाल्याची घटना घडली होती. त्यानंतर संपूर्ण राज्यात संतापाची लाट होती. या प्रकरणी त्याच शाळेत काम करणाऱ्या अक्षय शिंदे नावाच्या व्यक्तीला अटक करण्यात आली होती. त्यानंतर अक्षयचा एन्काऊंटर करण्यात आला. प्रतिहल्ल्यात एन्काऊंटर झाल्याचं पोलिसांनी सांगितलं पण अक्षयचं कुटुंब अन् विरोधकांनी हे खोटं असल्याचं म्हणत न्यायालयात धाव घेतली होती. पण आता अक्षयचे पालक केस लढायची नसल्याचं सांगत आहेत, त्यामुळे अनेक प्रश्न निर्माण होत आहेत.