पुण्यात गळती… वसंत मोरेंसमोर मोठं आव्हान, उद्धव ठाकरेंनी सोपवली मोठी जबाबदारी

पुण्यात गळती… वसंत मोरेंसमोर मोठं आव्हान, उद्धव ठाकरेंनी सोपवली मोठी जबाबदारी

Uddhav Thackeray Give big responsibility To Vasant More : राज्यात सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचं वारं वाहतंय. लोकसभा अन् विधानसभा निवडणुका (Pune) मागील वर्षी पार पडल्या. त्यानंतर आता सर्वच राजकीय पक्षांना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे वेध लागले आहेत. दरम्यान महापालिका निवडणुका तोंडावर आल्यात. अशातच पुण्यात ठाकरे गटाला गळती लागल्याचं समजतंय. याच पार्श्वभूमीवर पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) मोठा निर्णय घेतलाय, त्यांनी पुण्यात वसंत मोरेंवर (Vasant More) मोठी जबाबदारी सोपवली आहे.

फोटो अन् कॅमेऱ्यामागील नाट्य रूपेरी पडद्यावर, ‘छबी’ चित्रपट ‘या’ तारखेला होणार रिलीज

उद्धव ठाकरे यांनी पुणे महानगरपालिका प्रमुख निवडणूक समन्वयक म्हणून वसंत मोरे यांच्यावर जबाबदारी सोपवली आहे. नुकतीच वसंत मोरे यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती. या भेटीनंतर वसंत मोरे यांच्यावर मोठी जबाबदारी सोपवण्यात आलीय. महापालिका निवडणुकीच्या तोंडावर ठाकरे गटाला पुण्यात गळती लागलीय. त्यानंतर आता वसंत मोरे यांच्यासमोर मोठं आव्हान आहे. जबाबदारी मिळताच वसंत मोरे’आता लावा ताकद’ असं म्हणाले आहेत.

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षात पुणे जिल्ह्यामध्ये नवीन नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. यामध्ये प्रमुख निवडणूक समन्वयक म्हणून वसंत मोरे (पुणे शहर), प्रभारी शहरप्रमुख म्हणून संजोग वाघेरे (पिंपरी चिंचवड, भोसरी ), जिल्हा प्रमुख म्हणून उल्हास शेवाळे (पुरंदर, दौंड), जिल्हा संघटक म्हणून बाळासाहेब लक्ष्मण फाटक ( चिंचवड, मावळ ) यांची नियुक्ती तर लोणावळा शहर प्रमुखपदी परेश परशुराम बेडेकर, देहूगाव शहर प्रमुखपदी राजेंद्र गुलाबराव मोरे, देहूरोड शहर प्रमुखपदी संदीप बंडू बालगरे यांची नियुक्ती करण्यात आलीय.

फोटो अन् कॅमेऱ्यामागील नाट्य रूपेरी पडद्यावर, ‘छबी’ चित्रपट ‘या’ तारखेला होणार रिलीज

लोकसभा निवडणूक झाल्यानंतर वसंत मोरे हे ठाकरे गटात सामील झाले होते. त्यानंतर आता ठाकरेंनी त्यांच्यावर मोठी जबाबदारी सोपवली आहे. शरद पवार गट देखील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या अनुषंगाने कंबर कसून तयारी करत आहेत. कालच आमदार एकनाथ खडसे यांनी युद्धाची सामग्री बाहेर काढा, असं म्हणत कार्यकर्त्यांना तयारीला लागण्याचं आवाहन केलंय. राजकीय पक्षांमध्ये या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मोठी तयारी सुरू झालीय.

 

follow us
  • fb
  • instagram
  • youtube