‘प्रिय सखे…’ आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठ्यांमध्ये काय दडलंय? शिरीष महाराज मोरेंवर कर्जाचा डोंगर…
Shirish More Last Note Before Suicide : जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचे (Sant Tukaram Maharaj) 11 वे वंशज शिरीष मोरे यांनी आत्महत्या केल्याची घटना समोर आलीय. ते शिवव्याख्याते होते. शिरीष महाराजांनी जीवन का संपवलं? असाच प्रश्न सर्वांसमोर) होता. ज्या दिवशी ही धक्कादायक घटना घडली, त्यावेळी ते रात्री जेवण करून झोपायला गेले होते. सकाळी खोलीचं दार न उघडल्याने कुटुंबियांनी काळजीपोटी दार तोडलं. त्यानंतर शिरीष मोरे (Shirish More) हे गळफास अवस्थेत असल्याचं दिसलं.
रतन टाटांच्या मृत्यूपत्राने खळबळ! ‘या’ व्यक्तीला मिळणार 500 कोटी; चर्चांना उधाण..
शिरीष मोरे यांनी आत्महत्या करण्यापूर्वी चार चिठ्ठ्या लिहिल्या (Shirish More Suicide) होत्या. त्यात आई-वडिल, बहिण, पत्नी यांचा उल्लेख केलाय. सापडलेल्या या चिठ्ठ्यांमधून स्पष्ट झालंय की, त्यांनी आर्थिक विवंचनेतूनच हे टोकाचं पाऊल उचललं आहे. शिरीष महाराजांचा नुकताच साखरपुडा झाला होता, त्यांचं लग्न एप्रिल महिन्यात होणार होते. प्रसिद्ध प्रवचनकार आणि कीर्तनकार म्हणून ते काम करत होते.
शिरीष मोरे यांच्या मृत्यूनंतर सापडलेल्या चिठ्ठीत म्हटलंय की, युद्धातून पळ काढणाऱ्याने मदत मागणे चूक आहे. पण माझ्या आई-वडिलांना सांभाळा. चांगलं स्थळ पाहून दिदीचं लग्न लावून द्या.
डोक्यावर कर्ज झालंय. याची यादी देखील शिरीष महाराजांनी चिठ्ठीत मांडलीय. मुंबई सिंघवी 17 लाख, बचत गट 4 लाख, सोने तारण 2 लाख 25 हजार, गाडी 7 लाख आणि किरकोळ देणीघेणी 80 हजार असे 32 लाख 35 हजार रूपयांचं कर्ज त्यांच्यावर होतं. कर्ज फेडण्याची ताकद नसल्याचं त्यांनी म्हटलंय.
ठाकरे गटात महाभूकंप! 9 पैकी 6 खासदार करणार जय महाराष्ट्र; धक्कादायक नावांची चर्चा..
संत तुकाराम महाराज यांनी शिरीष महाराज मोरे यांनी टोकाचं पाऊल का उचललं? याचं कारण आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठयांमध्ये दडलंय. पहिल्या चिठ्ठीत शिरीष महाराजांनी आई, वडील आणि बहिणीला संदेश लिहिलाय. तर दुसऱ्या चिठ्ठीतून पत्नीला, तिसऱ्या चिठ्ठीतून कुटुंबाला आणि चौथ्या चिठ्ठीतून मित्रांना शेवटचा संदेश दिलाय. त्यांनी म्हटलंय की, माझ्यावर किती कर्ज आहे, याची कल्पना माझ्या बाबांना आबे, असं त्यांनी म्हटलंय. माझ्या कुटुंबाला साथ द्या, अशी विनंती त्यांनी मित्रांना केलीय.
चिठ्ठ्यांमधून शिरीष महाराजांनी आई, वडील, बहीण अन् होणाऱ्या पत्नीची देखील महाराजांनी माफी मागितली. होणाऱ्या पत्नीला खूप स्वप्न दाखवली होती, परंतु ती पूर्ण न करताच मी निघालोय. पण सखे तू कुठं थांबू नकोस, तुझं आयुष्य जग, असं देखील शिरीष महाराजांनी चिठ्ठीत म्हटलंय.