रतन टाटांच्या मृत्यूपत्राने खळबळ! ‘या’ व्यक्तीला मिळणार 500 कोटी; चर्चांना उधाण..

रतन टाटांच्या मृत्यूपत्राने खळबळ! ‘या’ व्यक्तीला मिळणार 500 कोटी; चर्चांना उधाण..

Ratan Tata News : जगप्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांचं (Ratan Tata) काही दिवसांपूर्वी निधन झालं. आता त्यांचं मृत्यूपत्र उघडण्यात आलं आहे. या मृत्यूपत्रातून अनेक खुलासे झाले आहेत. याबाबत कुणालाही माहिती नव्हती अशा काही गोष्टी उजेडात आल्या आहेत. त्यामुळे टाटा परिवारालाही आश्चर्याचा धक्का बसला आहे. रतन टाटा यांनी आपल्या मृत्यूपत्रात तब्बल 500 कोटींपेक्षा जास्त रुपयांची संपत्ती अशा व्यक्तीच्या नावावर केली आहे ज्याची फारशी कुणालाच माहिती नाही. या मिस्ट्रीमॅनचे रतन टाटा यांच्याशी जवळपास 60 वर्षे जुने संबंध होते. याबाबतीत अजून अधिकृत माहिती मिळाली नसली तरी हा व्यक्ती नेमका कोण आहे याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

कोण आहे मोहिनी दत्ता

रतन टाटा यांनी आपल्या मृत्यूपत्रात ज्या व्यक्तीला 500 कोटी रुपये देण्याची घोषणा केली आहे तो व्यक्ती मूळचा जमशेदपूर येथील आहे. या ट्रॅव्हल क्षेत्रातील उद्योजक मोहिनी मोहन दत्ता आहेत. मिडिया रिपोर्ट्सनुसार दत्ता आणि त्यांच्या परिवाराकडे स्टॅलियन ट्रॅव्हल एजन्सीची मालकी होती. सन 2013 मध्ये ताज सर्व्हिसेसमध्ये विलीनीकरण करण्यात आले. मोहिनी दत्ता आणि त्यांच्या कुटुंबाकडे स्टॅलियनची 80 टक्के हिस्सेदारी होती. बाकीची मालकी टाटा इंडस्ट्रिजकडे होती. मोहिनी दत्ता या टीसी ट्रॅव्हल सर्व्हिसेसच्या संचालक देखील राहिल्या आहेत.

Ratan Tata Biopic: रतन टाटा यांच्या जीवनावर बनणार चित्रपट, 190 हून अधिक देशांमध्ये होणार प्रदर्शित

रतन टाटा यांच्या आयुष्याची माहिती असणाऱ्या अनेकांनी सांगितलं की रतन टाटा आणि मोहिनी दत्ता जुने सहकारी होते. टाटा यांच्या कुटुंबातील सदस्यांसह त्यांचे निकटवर्तीय याबाबत जाणून होते. ईटीच्या रिपोर्टनुसार याबाबतीत मोहिनी दत्ता यांनी प्रतिक्रिया देण्यास नकार दिला आहे. मृत्यूपत्राच्या एक्झिक्युटर्समध्ये रतन टाटांच्या सावत्र बहिणी शिरीन आणि डीना जेजीभोय यांनीही कमेंट करण्यास नकार दिला होता. डेरियस खंबाटा यांनी कोणतीही टिप्पणी केली नाही. चौथे एक्झिक्यूटर मेहली मिस्त्री यांनी त्या व्यक्तीवर कोणतीही प्रतिक्रिया देण्यास नकार दिला. मोहिनी दत्ता यांच्या दोन मुलींपैकी एकीने 2024 पर्यंत टाटा ट्रस्टमध्ये 9 वर्षे काम केले.

रतन टाटांचे दोन ट्रस्ट

रतन टाटा यांची बहुतांश संपत्ती धर्मार्थ कार्यांसाठी समर्पित करण्यात आली आहे. रतन टाटा यांच्या सावत्र बहिणी ज्यांना बेनिफिशियरी म्हणून नामित करण्यात आले होते. या दोघींनी त्यांच्या वाट्याची संपत्ती दान देण्याची इच्छा व्यक्त केली आहे. या रहस्याची माहिती झाल्याने जोरदार चर्चा सुरू झाली आहे. रतन टाटा यांनी अंतिम काळात आपल्या संपत्तीचा मोठा हिस्सा दान देण्यासाठी टाटा एंडोमेंट फाउंडेशन आणि रतन टाटा एंडोमेंट ट्रस्ट या दोन संस्थांची स्थापना केली होती. टाटा समूहाची होल्डिंग कंपन टाटा सन्समध्ये त्यांच प्रत्यक्ष 0.83 टक्के हिस्सेदारी होती आणि त्यांची एकूण संपत्ती 8 हजार कोटी रुपये होती.

Ratan Tata: तुम्ही गेलात… कधीकाळी रतन टाटा यांना डेट करणाऱ्या अभिनेत्रीला शोक अनावर!

follow us
  • fb
  • instagram
  • youtube