Badlapur Encounter: विरोधकांकडून पोलिसांचे खच्चीकरण करण्याचा प्रयत्न; फडणवीसांचे टीकास्त्र

  • Written By: Published:
Badlapur Encounter: विरोधकांकडून पोलिसांचे खच्चीकरण करण्याचा प्रयत्न; फडणवीसांचे टीकास्त्र

Devendra Fadnavis : बदलापूरमधील शाळेतील दोन अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप असलेला अक्षय शिंदे (Akshay Shinde) पोलीस एन्काऊंटरमध्ये (Police Encounter) मारला गेला. अक्षयने पोलीस कर्मचाऱ्याची पिस्तुल हिसकावून पोलिसांवर हल्ला केला. त्यानंतर पोलिसांनी स्वसंरक्षणार्थ केलेल्या हल्ल्यात अक्षयचा मृत्यू झाला. मात्र हा एन्काऊंटर ठरवून करण्यात आल्याचा आरोप विरोधक करत आहेत. आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवी (Devendra Fadnavis) यांनी यावर भाष्य केले आहे.

लाडक्या बहिणीचा फडणवीसांच्या कार्यालयात धुडगूस, फडणवीस म्हणाले, ‘कुणीतरी जाणीवपूर्वक…’ 

शिर्डी येथे लाडकी बहीण योजनेच्या कार्यक्रमानंतर देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलतांना त्यांनी अनेक विषयांवर भाष्य केलं. यावेळी अक्षय शिंदेचा एन्काउंटर आणि कोर्टाचे त्याच्या अंत्यसंस्कारा विषयी जे निर्देश दिलेत, त्यावरीह फडणवीसांनी भाष्य केलं. ते म्हणाले, एन्काऊंटरविषयी विरोधक काय म्हणतात, याच्याशी मला काहीही देणंघेणं नाही. ते दुटप्पी लोक आहेत. कारण, ते एकीकडे मोठमोठे अग्रलेख लिहित असतात आणि आरोपीला लगेच फासावर लटकवण्याची मागणीही करतात. एन्काऊंटरचे समर्थन करतात. पण, या बदलापूर एन्काऊंटर प्रकरणात त्यांनी पोलिसांनी प्रत्युतरादाखल केलेल्या कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. या माध्यमातून पोलिसांचे खच्चीकरण करण्याचा प्रयत्न करत आहेत, अशी टीका फडणवीसांनी केली.

Nora Fatehi: ‘मटका’च्या सेटवरील नोराचा मराठी तोरा, मराठमोळा लुक आला समोर 

पुढं ते म्हणाले, व्यक्ती कोणीही असो, मृत्यूनंतर त्याचे अंतिम संस्कार करणे ही सरकारची घटनात्मक जबाबदारी आहे. सदर व्यक्ती तुमची आवडती नसली, समाजविघातक असला तरी ते करावे लागतात. त्यामुळे कोर्टाने जे सांगितल त्यावर प्रशासन कारवाई करेल, असं फडणवीस म्हणाले.

लाडक्या बहिण योजनेवर विरोधकांकडून टीका होत असलेल्या टीकेवर बोतलांना फडणवीस म्हणाले की, मला त्यांची टीका केल्यानंतर अतिशय वाईट वाटते. राजकारणात एकाने विकासाची रेषा उमटवली तर त्यापेक्षा मोठी रेषा उमटवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. दुसऱ्याची रेषा पुसून टाकण्याचा प्रयत्न करणे हा एकप्रकारे जनतेशी द्रोह आहे. त्यामुळे माझी विनंती आहे की त्यांनी रोज कोर्टात जाणे बंद करावे, ही योजना कशी थांबवता येईल याचा प्रयत्न करणं, आम्ही निवडणून आलो तर योजना थांबवून टाकू, या सगळ्या गोष्टी त्यांनी बंद केल्या पाहिजेत, असा टोला त्यांनी विरोधकांना लगावला.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube