टोरेंटसारखा प्रकल्प नको ; पर्यावरण नष्ट करण्यासाठी तुम्हाला निवडून दिलं का? सयाजी शिंदे भडकले

Sayaji Shinde On Torrent Company :  गुजरातच्या टोरेंट कंपनीच्या एका प्रस्तावित प्रकल्पासाठी सध्या रायगडच्या कर्जतमध्ये मोठ्या प्रमाणात

  • shakir sayyad
  • Written By: Published:
Sayaji Shinde On Torrent Company

Sayaji Shinde On Torrent Company :  गुजरातच्या टोरेंट कंपनीच्या एका प्रस्तावित प्रकल्पासाठी सध्या रायगडच्या कर्जतमध्ये मोठ्या प्रमाणात वृक्षतोड सुरु असल्याने विरोधक राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल करत आहे. राज्य सरकारवर चारही बाजूने टीका होत आहे. तर आता अभिनेते आणि पर्यावरणवादी कार्यकर्ते सयाजी शिंदे यांनी देखील सरकारवर हल्लाबोल केला आहे.  टोरेंटसारखा एकही प्रकल्प आम्हाला नको. पर्यावरण नष्ट करण्यासाठी तुम्हाला निवडून दिलं आहे का? असं सयाजी शिंदे म्हणाले.

माध्यमांशी बोलताना सयाजी शिंदे म्हणाले की, टोरेंटसारखा (Torrent Company) एकही प्रकल्प आम्हाला नको. त्यासाठी कोणतीही झाडे तोडायला नकोत. जी जुनी पर्यावरणाची व्यवस्था आहे त्याला हात न लावता प्रकल्प करा. पर्यावरण नष्ट करण्यासाठी तुम्हाला निवडून दिलं आहे का? आहे ती मोठी झाडं तोडू नका, हीच आमची मागणी आहे असं माध्यमांशी बोलताना सयाजी शिंदे (Sayaji Shinde) म्हणाले.

तसेच सेव्ह सह्याद्री (Save Sahyadri) अशी एक संघटना तयार करतोय. त्यामध्ये एक लाख मुलं तयार करतोय. त्या माध्यमातून सह्याद्रीमध्ये अशा प्रकारच्या पर्यावरणाचा ऱ्हास करणाऱ्या प्रकल्पांना आम्ही विरोध करणार असल्याची देखील माहिती त्यांनी यावेळी दिली.

महाराष्ट्रातील SIR प्रक्रियेला आव्हान ; सर्वोच्च न्यायालयाची निवडणूक आयोगाला नोटीस-

जगात फक्त 18 टक्के जंगलं शिल्लक – सयाजी शिंदे 

पुढे बोलताना सयाजी शिंदे म्हणाले की, विकासकामांच्या नावावर जमिनी घेतल्या तर तिथल्या पुढच्या पिढ्या भिकेला लागतील. यापुढे एकही झाड तोडू देऊ नका नाहीतर विकास संपलेला आहे असं समजा. यामध्ये एकही झाड न तोडता हा प्रकल्प करावा, आमचा त्याला विरोध नाही. जगात फक्त 18 टक्के जंगलं शिल्लक आहेत ते आपल्याला 33 करणे आवश्यक आहे पण ते वाढवण्याऐवजी ही झाडं तोडली जात आहेत असं देखील यावेळी सयाजी शिंदे म्हणाले.

follow us