“अमर प्रेम कथा” येत्या व्हॅलेंटाईन्स डेला प्रेमाला मिळणार वेगळा ट्विस्ट; पहिलं पोस्टर आऊट

Amar Prem Katha : समीर आशा पाटील दिग्दर्शित “अमर प्रेम कथा” या चित्रपटाचं पहिलं पोस्टर नुकतंच प्रदर्शित करण्यात आलं आहे. एका बाजूला जिवंत

  • shakir sayyad
  • Written By: Published:
Amar Prem Katha

Amar Prem Katha : समीर आशा पाटील दिग्दर्शित “अमर प्रेम कथा” या चित्रपटाचं पहिलं पोस्टर नुकतंच प्रदर्शित करण्यात आलं आहे. एका बाजूला जिवंत हात आणि दुसऱ्या बाजूला भुताटकी हात. तर या दोन्ही हातांच्या मध्ये काट्यांनी वेढलेलं लाल गुलाबाचं फूल आहे. पोस्टरमधूनच प्रेम आणि हॉररची खास झलक पाहायला मिळते त्यामुळे ही प्रेमकथा वेगळी असणार याची उत्सुकता वाढते. ‘सुपर डुपर’ सिनेमाच्या यशानंतर लेखक-दिग्दर्शक समीर आशा पाटील पुन्हा एकदा वेगळ्या विषयासह प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत.

मराठी इंडस्ट्रीतील आणि आजच्या घडीचे लोकप्रिय कलाकार या चित्रपटात एकत्र दिसणार आहेत. प्रथमेश परब, रितिका श्रोत्री, ओंकार भोजने, पार्थ भालेराव, रोहित माने, विनायक माळी आणि सयाजी शिंदे मुख्य भूमिकेतून प्रेक्षकांचे मनोरंजन करतील. प्रेमाची भन्नाट गोष्ट, सोबत भुताटकीचा ट्विस्ट आणि हसून हसून लोटपोट करणारा विनोद! या आगळ्यावेगळ्या रोमँटिक हॉरर कॉमेडी जॉनरमधून साकारलेला हा चित्रपट तरुणाईसाठी मनोरंजनाची खास मेजवानी ठरणार आहे.

इराणचे 5 तेल टँकर्स नष्ट; अमेरिकन लष्कराची मोठी कारवाई

डॉ. पल्लवी जाधव, डॉ. गजानन जाधव आणि राम जाधव यांनी या चित्रपटाची निर्मिती केली असून, समीर आशा पाटील यांनी लेखन आणि दिग्दर्शन केलं आहे. या सिनेमामुळे 2027 चा व्हॅलेंटाईन चित्रपटगृहात वेगळा ठरणार हे नक्की. ‘अमर प्रेम कथा’ संपूर्ण महाराष्ट्रात या व्हॅलेंटाईन्स डेला मोठ्या पडद्यावर नक्की बघा.

पिंपरी चिंचवडच्या शाश्वत विकासासाठी पुढील 50 वर्षांचा आराखडा ; नार्वेकर यांच्याकडून सूर्यवंशी यांच्या व्हिजनचे कौतुक-

follow us