12th Fail सिनेमाबद्दल इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने थेटच सांगितलं; म्हणाला, “जिद्द आणि संघर्षाची… “

12th Fail सिनेमाबद्दल इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने थेटच सांगितलं; म्हणाला, “जिद्द आणि संघर्षाची… “

Rohit Sharma 12th Fail Movie: ’12th फेल’ (12th Fail Movie) सिनेमाने चाहत्यांच्या मनात स्वतःचे अनोख स्थान निर्माण केलं. विधू विनोद चोप्रा (Vidhu Vinod Chopra) यांच्या ’12th फेल’ सिनेमाला चाहत्यांनी डोक्यावर घेतलं आहे. तर दुसरीकडे अभिनेता विक्रांत मेसी आणि अभिनेत्री मेधा शंकर हिने देखील त्यांच्या भूमिकेला योग्य न्याय दिला. आता टीम इंडिया (Team India) लोकप्रिय कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) लोकप्रिय चित्रपट ’12th Fail’ बद्दलचा रिव्ह्यू सांगत असताना पाहायला मिळत आहे.


सध्या भारतीय संघ इंग्लंडविरुद्ध पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळत आहे, त्यातील तिसरा सामना राजकोटमध्ये 15 फेब्रुवारीपासून खेळवला जाणार आहे. पण त्याआधी भारतीय कर्णधार एका कार्यक्रमात सहभागी झाला होता, जिथे तो ’12वी फेल’ चित्रपटाबद्दल बोलताना पाहायला मिळत आहे. या सिनेमाबद्दल हिटमॅनने जबरदस्त रिव्ह्यू दिला आहे.

या कार्यक्रमाचा एक व्हिडिओ वेगाने सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे, यामध्ये रोहित शर्मा चित्रपटाबद्दल बोलत असल्याचे दिसत आहे. व्हिडिओमध्ये भारतीय कर्णधाराला प्रश्न विचारला जात असल्याचे दिसून येत आहे, असा कोणताही चित्रपट किंवा शो आहे का जो तुम्ही घाईघाईत पाहिला आहे? याला उत्तर देत असताना रोहित शर्माने थेटच सांगितले आहे की, “मी ’12वी फेल’ चित्रपट पाहिला. तो चांगला चित्रपट आहे. या चित्रपटातून आयुष्याला चांगला वळण देण्याचं मार्गदर्शन केले आहे. 12th Fail या सिनेमात जिद्द आणि संघर्षाची प्रेरणादायी कथा पाहायला मिळाली आहे.

तिसऱ्या कसोटीत आघाडी घेण्याच्या इराद्याने टीम इंडिया मैदानात उतरणार आहे. भारत आणि इंग्लंड यांच्यात सुरू असलेल्या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेत दोन सामने खेळले गेले आहेत. दोन सामन्यांनंतर मालिका 1-1 अशी बरोबरीत आहे. आता तिसरी कसोटी 15 फेब्रुवारीपासून राजकोटमध्ये सुरू होणार आहे. राजकोट कसोटीतून मालिकेत आघाडी घेण्याच्या इराद्याने भारतीय संघ मैदानात उतरणार आहे.

रिलीजच्या तिसऱ्या दिवशी दणक्यात आपटला ‘तेरी बातों में ऐसा उल्झा जिया’, शाहीदचा सिनेमा डब्बागुल?

विराट कोहलीही गेल्या तीन कसोटींमधून बाहेर: भारतीय संघ विराट कोहलीशिवाय (Virat Kohli) संपूर्ण मालिका खेळणार आहे. गेल्या तीन कसोटी सामन्यांमध्येही विराट कोहली वैयक्तिक कारणांमुळे भारतीय संघाचा भाग होऊ शकला नाही. बीसीसीआयने (BCCI) पाच कसोटींसाठी दोन टप्प्यात टीम इंडियाची घोषणा केली. पहिल्या दोन कसोटींसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली होती, ज्यामध्ये विराट कोहलीचा समावेश करण्यात आला होता, मात्र त्यानंतर कोहलीने दोन्ही कसोटींमधून आपले नाव मागे घेतल्याचे सांगण्यात आले. यानंतर जेव्हा शेवटच्या तीन कसोटींसाठी टीम इंडियाची घोषणा करण्यात आली तेव्हा त्यातही विराट कोहली सहभागी नसल्याची माहिती समोर आली आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज