Rohit Sharma : रो’हिट’ कारनामा ! ‘या’ खास रेकॉर्डसह पटकावला पहिला नंबर
Rohit Sharma : अफगाणिस्तान विरुद्धच्या तीन टी 20 सामन्यांच्या मालिकेतील (IND vs AFG) दोन सामने जिंकून टीम इंडियाने मालिकाही (Team India) खिशातच टाकली आहे. तिसरा सामना आता फक्त औपचारिकतेचाच राहिला आहे. या दोन्ही सामन्यात कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) फार काही विशेष कामगिरी करू शकला नाही. तरीदेखील त्याच्या नावावर आणखी एक रेकॉर्ड नोंदले गेले आहे. दुसरा सामना खेळल्यानंतर रोहित शर्माने त्याच्या टी 20 कारकिर्दीत 150 सामने पूर्ण केले आहेत. ही कामगिरी करणारा तो क्रिकेट जगतातील पहिलाच खेळाडू ठरला आहे.
2007 मध्ये रोहितने टी 20 क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. याच वर्षी भारतीय संघाने टी 20 विश्वचषकही जिंकला होता. तेव्हापासून रोहितने 150 टी 20 सामने खेळले आहेत. यामध्ये 4 शतके आणि 29 अर्धशतकांचाही समावेश आहे. रोहितनंतर आयर्लंडचा फलंदाज पॉल स्टर्लिंग दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्याने एकूण 128 सामने खेळले आहेत.
Rohit Sharma : शू्न्यावर आऊट झाला तरीही इतिहास रचला; ‘या’ खास रेकॉर्डचा रोहित मानकरी
याआधी पहिल्या सामन्यातही रोहितने खास रेकॉर्ड केले होते. एकतर तब्बल 14 महिन्यांनंतर रोहित टी 20 क्रिकेटमध्ये परतला होता. या सामन्यात तो शून्यावर धावबाद झाला. भारताने विजय मिळवला. या विजयाबरोबरच रोहितने देखील मोठी कामगिरी केली. रोहित शर्मा क्रिकेटच्या इतिहासातील 100 आंतरराष्ट्रीय टी 20 विजयात सहभागी होणार पहिलाच खेळाडू ठरला आहे.
टी 20 वर्ल्डकप पूर्वी असणारी ही शेवटची आंतरराष्ट्रीय मालिका भारतासाठी अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. तर या सिरीजमध्ये रोहित शर्मा आणि विराट कोहली (Virat Kohli) यांचं कमबॅक झालं. मात्र या तीन सामन्यांच्या सिरीजमधील पहिल्या सामन्यात विराट कोहली खेळलाच नाही. काही वैयक्तिक कारणांमुळे विराट खेळणार नसल्याचं सांगण्यात आले होते.
Rohit Sharma ; अयोध्येतील राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे रोहित शर्मालाही आमंत्रण!