Rohit Sharma ; अयोध्येतील राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे रोहित शर्मालाही आमंत्रण!

Rohit Sharma ; अयोध्येतील राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे रोहित शर्मालाही आमंत्रण!

Rohit Sharma : टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माला (Rohit Sharma) अयोध्येतील राम मंदिरासाठी (Ram Mandir) पुढील महिन्यात होणाऱ्या प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमाचे निमंत्रण मिळाले आहे. या कार्यक्रमासाठी आमंत्रित करण्यात आलेल्या 8 हजार लोकांमध्ये त्याचा समावेश आहे. अयोध्येतील राम मंदिरात 22 जानेवारी 2024 रोजी प्राणप्रतिष्ठा होणार आहे.

प्राणप्रतिष्ठा सोहळा मंदिराची व्यवस्थापकीय संस्था श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र यांच्या देखरेखीखाली पार पडणार आहे. हीच संस्था या भव्य सोहळ्यासाठी देशभरातून आणि जगभरातील लोकांना आमंत्रित करत आहे. या अंतर्गत या कार्यक्रमासाठी 8000 लोकांना आमंत्रित करण्यात आले आहे. मात्र, या आठ हजारांपैकी सहा हजार संत असतील, असेही बोलले जात आहे. उर्वरित दोन हजार पाहुण्यांमध्ये रामजन्मभूमीसाठी लढलेल्यांची कुटुंबे, कामगार आणि प्रतिष्ठित व्यक्तींचा समावेश असेल.

Sonu Sood ने पुन्हा आला धावून; चेन्नई पूरग्रस्तांना अनोखी मदत

देशाच्या राजकारणातील जवळपास सर्वच मोठे नेते या सोहळ्यात पाहायला मिळणार आहेत. अनेक बडे उद्योगपती आणि मनोरंजन क्षेत्रातील कलाकारही येथे आमंत्रित आहेत. देशातील सर्वात मोठे उद्योगपती रतन टाटा, मुकेश अंबानी आणि गौतम अदानी यांना आमंत्रित करण्यात आले आहे. अमिताभ बच्चन यांनाही बोलावण्यात आले आहे. क्रीडाविश्वातूनही एक एक नाव पुढे येत आहे. या कार्यक्रमासाठी सचिन तेंडुलकर आणि विराट कोहली यांनाही आमंत्रित करण्यात आल्याची बातमी आली. आता रोहित शर्मालाही निमंत्रण मिळाल्याची माहिती मिळत आहे.

सुरुची अडारकरने बांधली पियुष रानडेसोबत लग्नगाठ, पाहा फोटो

25 जानेवारीपासून कसोटी मालिका
रोहित शर्मा आणि विराट कोहली यांना या कार्यक्रमात सहभागी होणे थोडे कठीण जाणार आहे. भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यांची कसोटी मालिका 25 जानेवारीपासून सुरू होणार आहे. कसोटी क्रिकेटमध्ये इंग्लंड हा संघ खूप मजबूत आहे. जेव्हा राम मंदिर प्राणप्रतिष्ठा कार्यक्रम होईल, तेव्हा रोहित आणि विराट इंग्लंडच्या आव्हानाला तोंड देण्यासाठी तयारी करत असतील. अशा परिस्थितीत या दोघांनाही सामन्याच्या दोन दिवस आधी कोणत्याही कार्यक्रमात सहभागी होणे शक्य होणार नाही.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube