Sonu Sood ने पुन्हा आला धावून; चेन्नई पूरग्रस्तांना अनोखी मदत
Sonu Sood : कोरोना काळात गरिबांसाठी देवासारखा धावून आलेला सोनू सूद (Soonu Sood) अद्याप मदत कार्यात गुंतला आहे. गेल्या कित्येक महिन्यांपासून सोनू लोकांना वेगवेगळ्या प्रकारे मदत करत आहे. कधी तो कोणाला उपचारांसाठी मदत करताना दिसतो (Social media) तर कधी मुलांच्या शिक्षणामध्येही मोलाचा वाटा उचलत असतो. गेल्या काही दिवसाखाली त्याने एका तरुणाला पायलट (pilot)बनण्यास मदत केली होती. त्यानंतर आता सोनूने पुन्हा एक सामाजिक उपक्रम हाती घेतला आहे. यावेळी त्याने चेन्नई पूरग्रस्तांना अनोखी मदत केली आहे.
चेन्नई पूरग्रस्तांना अनोखी मदत…
भारताच्या दक्षिण किनारपट्टीवर ‘मिचॉन्ग’ चक्रीवादळाने (Cyclone Michaung) धुमाकूळ घातला होता. या चक्रीवाळामुळे आंध्र प्रदेश आणि तामिळनाडूमध्ये आभाळा फाटल्याची परिस्थिती निर्माण झाली होती. अनेक रस्ते पाण्याखाली, विमानतळ बुडाले आहेत. तर दक्षिण दिशेच्या अनेक रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या होत्या. त्यामुळे या पूरग्रस्त नागरिकांना सोनूने मदत केली आहे. त्याने सोनू सूद फाऊंडेशन या त्यांच्या प्रतिष्ठानद्वारे ही मदत देऊ केली आहे.
PM मोदींची भेट अन् इटलीचा चीनला धक्का : PM जॉर्जिया मेलोनी यांचा मोठा निर्णय
यामध्ये अत्यावश्यक वस्तूंचे वाटप , वैद्यकीय मदत आणि घरांच्या पुनर्बांधणी यासह विविध बाबतीत सोनूने मदत केली आहे. तसेच तो स्वतः यासर्व मदत कर्यावर देखरेख ठेवत आहे. तर चेन्नईतील पूरग्रस्तांच्या डोळ्यातील अश्रू पुसण्याचं काम सोनू सूज करत असल्याने त्याचं सर्व स्तरावरून त्याचं कौतुक केलं जात आहे. त्याचं हे कार्य उल्लेखनीय ठरत आहे.
मराठ्यांच्या नादी लागू नका, जड जाईल; जरांगेंचा भुजबळांना इशारा
या वादळाच्या तडाख्याने मुसळधार पाऊस होत असून या पावसामुळे आतापर्यंत आठ जणांचा मृत्यू झाला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांनी आंध्र प्रदेश आणि तामिळनाडूच्या मुख्यमंत्र्यांबरोबर चर्चा करत मदतीचे आश्वासन दिले आहे. मिचॉन्ग चक्रीवादळ पूर्व किनारपट्टीजवळ दाखल झाल्याने मुसळधार पाऊस होत आहे. आता आज हे वादळ आंध्र प्रदेशच्या (Andhra Pradesh) किनारपट्टीवर धडकू शकते. आज नेल्लोर ते मछलीपट्टणम दरम्यान आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीवर धडकण्याची शक्यता आहे.