मराठ्यांच्या नादी लागू नका, जड जाईल; जरांगेंचा भुजबळांना इशारा

  • Written By: Published:
मराठ्यांच्या नादी लागू नका, जड जाईल; जरांगेंचा भुजबळांना इशारा

Manoj Jarange Patil : मनोज जरांगे पाटी (Manoj Jarange Patil) यांनी मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्याची मागणी केली. त्यांच्या मागण्या मान्य करण्यासाठी त्यांनी सरकारला 24 डिंसेंबरपर्यंत डेडलाईन दिली. मात्र, ओबीसी नेत्यांकडून जरांगे पाटलांच्या मागणीला विरोध होत आहे. मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी ओबीसी नेत्यांना सोबत घेऊन अनेक सभा घेतल्या. जरांगे पाटलांवर टीका केली. दरम्यान, आज हिंगोली येथील जाहीर सभेतून जरांगे पाटील यांनीही भुजबळांवर निशाणा साधला. मराठ्यांच्या नादी लागू नका, गप झोपा असा इशारा जरांगे यांनी दिला.

Madarsa Board : योगी आदित्यनाथ यांच्या रडारवर मदराशे ! शंभर कोटी विदेशातून आले ? चौकशीसाठी एसआयटी 

आज सभेत बोलतांना जरांगे पाटील म्हणाले की, मराठा आंदोलनात महिला पहिल्यापासून सहभागी आहेत. ज्या ज्या वेळी महिलांनी एखादा विषय मनावर घेतला, त्या त्यावेळी क्रांती झाली. आपल्या लेकरा-बाळांना आरक्षण मिळावं म्हणून अनेक मराठा बांधव, महिला, तरूण अंतरवलीतील आंदोलनात सहभागी झाले होते. शांततेच्या मार्गाने आंदोलन सुरू होतं. मात्र, आंदोलकांवर प्राणघातक हल्ला झाला. माता-बहिणींच्या डोक्याच्या चिंधड्या झाल्या. आम्ही शांततेच्या मार्गाने आंदोलन करत होता. याशिवया, आमची काय चूक होती? हे निर्दयी सरकार आहे, अशी टीका जरांगेली केली. आता माघार नाही, माझा जीव गेला तरीही मागं हटणार नाही अस जरांगे पाटील म्हणाले.

सातव्या महिन्यातच प्रसवकळा; नगरमध्ये 18 वर्षांच्या युवतीसाठी ‘108’ रुग्णवाहिका ठरली देवदूत 

…तर सरकारची खैर नाही
मराठ्यांचं आंदोलन मोडलं पाहिज. मराठ्यांना आरक्षण दिलं तर मराठे मोठे होतील. मराठ्यांना मोठं होऊ द्यायचं नाही, हे षडयंत्र आहे. मराठ्यांरव खोटे गुन्हे नोंदवले. सरकारने गुन्हे मागे घेऊ असं सांगितलं. मात्र, अद्यापही गुन्हे मागे घेतली. आता 24 तारखेला आरक्षण दिलं नाही तर मात्र, सरकारची खैर नाही. आरक्षण घेतल्याशिवाय, सरकारला सुट्टी नाही, असं जरांगे पाटील म्हणाले.

मराठ्यांवर अन्याय केला तर तुमचं फिरणंही मुश्कील होईल. भुजबळांचं ऐकू नका. तो जातीयवाद करतो. त्याला जातीलय तेढ निर्णाण करायची आहे. तो लोकांचं शिक्षण काढतो. घटनेच्या पदावर बसतो आणि स्वत: कायदा पायदळी तुडवतो. भुजबळ तुम्ही मराठ्यांच्या नादी लागू नका, जड जाईल, असा इशाराही जरांगेंनी दिला.

जरांगे म्हणाले, आतापर्यंत ३५ लाख नोंदी प्राप्त झाल्या आहेत. त्या आधारावर सुमारे अडीच कोटी मराठा समाजाला आरक्षणाचा फायदा होणार आहे. आणखी नोंदींचा शोध सुरू आहे. आमच्या मुलांचे भविष्य आरक्षणावर अवलंबून आहे, असंही जरांगे म्हणाले.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube