Rohit Sharma : शू्न्यावर आऊट झाला तरीही इतिहास रचला; ‘या’ खास रेकॉर्डचा रोहित मानकरी

Rohit Sharma : शू्न्यावर आऊट झाला तरीही इतिहास रचला; ‘या’ खास रेकॉर्डचा रोहित मानकरी

Rohit Sharma : अफगाणिस्तानविरुद्धच्या तीन टी 20 सामन्यांतील पहिल्या सामन्यात भारतीय (IND vs AFG) संघाने जबरदस्त खेळ करत अफगाणिस्तानचा पाडा केला. प्रथम फलंदाजी करताना अफगाणिस्तानने भारतासमोर 159 धावांचे आव्हान ठेवले होते. टीम इंडियाने 17.5 ओव्हर्समध्ये आव्हान पार करत मोठा विजय मिळवला. या सामन्यात शिवम दुबेने (Shivam Dubey) 40 चेंडूत 60 धावा फटकावल्या. या सामन्यात भारतीय कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) होता. मात्र त्याला या सामन्यात फार काही करता आले नाही. तरीदेखील त्याच्या नावावर एक अनोखे रेकॉर्ड नोंदले गेले. एकतर तब्बल 14 महिन्यांनंतर रोहित टी 20 क्रिकेटमध्ये परतला होता. या सामन्यात तो शून्यावर धावबाद झाला. भारताने विजय मिळवला. या विजयाबरोबरच रोहितने देखील मोठी कामगिरी केली. रोहित शर्मा क्रिकेटच्या इतिहासातील 100 आंतरराष्ट्रीय टी 20 विजयात सहभागी होणार पहिलाच खेळाडू ठरला आहे.

IND vs AFG T20I Series : अफगाणिस्तान विरोधात कोहलीविनाच मैदानात उतरणार टीम इंडिया; यामुळे घेतली माघार

टी 20 वर्ल्डकप पूर्वी असणारी ही शेवटची आंतरराष्ट्रीय मालिका भारतासाठी अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. तर या सिरीजमध्ये रोहित शर्मा आणि विराट कोहली (Virat Kohli) यांचं कमबॅक झालं. मात्र या तीन सामन्यांच्या सिरीजमधील पहिल्या सामन्यात विराट कोहली खेळलाच नाही. काही वैयक्तिक कारणांमुळे विराट खेळणार नसल्याचं सांगण्यात आले होते.

या सामन्यात नाणेफेक जिंकून भारताने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. भारतीय गोलंदाजांनी अफगाणिस्तानच्या फलंदाजांवर नियंत्रण ठेवले. अक्षर पटेलने दोन विकेट्स घेत अफगाणिस्तानचे सलामीचे फलंदाज तंबूत परत पाठवले. त्यामुळे अफगाणिस्तानला सुरुवात चांगली करता आली नाही. धाव़गतीही मंदच राहिली. त्यामुळे 20 ओव्हर्समध्ये कशातरी 158 धावा करता आल्या.

या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या टीम इंडियाला सुरुवातीलाच धक्का बसला. कर्णधार रोहित शर्मा शून्यावरच धावबाद झाला. त्यानंतर शुभमन गिल आणि तिलक वर्मा या दोघांनी संघाचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला.  मात्र 23 धावांवर गिलची विकेट गेली. त्यानंतर आलेल्या शिवम दुबे आणि तिलक वर्मा या दोघांनी चांगली फलंदाजी करत संघाच्या डावाला आकार दिला. नवव्या ओव्हरमध्ये भारतीय संघाने 70 धावांचा आकडा पार केला होता. त्यानंतर तिलक वर्मा बाद झाला.

T20 मालिकेपूर्वीच अफगाणिस्तानला मोठा धक्का, घातक गोलंदाज संघातून बाहेर

 

follow us
  • fb
  • instagram
  • youtube