T20 मालिकेपूर्वीच अफगाणिस्तानला मोठा धक्का, घातक गोलंदाज संघातून बाहेर
IND vs AFG T20 : भारत आणि अफगाणिस्तान (IND vs AFG) यांच्यात उद्यापासून 3 सामन्यांची टी-20 मालिका खेळवली जाणार आहे. या मालिकेपूर्वीच अफगाणिस्तानला मोठा धक्का बसला आहे. संघाचा अनुभवी गोलंदाज राशिद खान (Rashid Khan) संपूर्ण मालिकेतून बाहेर पडला आहे. राशिद आधीच जखमी झाला होता. परंतु तो बरा होईल अशी आशा होती. पण अजून फिट होऊ शकलो नाही.
टीम इंडियासाठी ही मालिका खूप महत्त्वाची आहे. या वर्षाच्या मध्यात होणाऱ्या T20 विश्वचषकापूर्वी टीम इंडियाची ही शेवटची टी-20 मालिका आहे. भारतीय क्रिकेटचे दिग्गज रोहित शर्मा आणि विराट कोहली 14 महिन्यांनंतर टी-20 क्रिकेटमध्ये पुनरागमन करणार आहेत. T20 विश्वचषक 2022 च्या उपांत्य फेरीत भारताचा इंग्लंडकडून पराभव झाल्यापासून हे दोन्ही खेळाडू T20 क्रिकेटपासून दूर आहेत.
भारतीय संघ – रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, यशस्वी जैस्वाल, विराट कोहली, तिलक वर्मा, रिंकू सिंग, जितेश शर्मा (यष्टीरक्षक), संजू सॅमसन (यष्टीरक्षक), शिवम दुबे, वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल, रवी बिश्नोई, कुलदीप यादव, अर्शदीप सिंग, आवेश खान, मुकेश कुमार.
अफगाणिस्तान संघ – इब्राहिम जद्रान (कर्णधार), रहमानउल्ला गुरबाज (यष्टीरक्षक). इकराम अलीखिल (यष्टीरक्षक), हजरतुल्ला झाझई. रहमत शाह, नजीबुल्ला जद्रान, मोहम्मद नबी, करीम जाना, अजमुल्ला उमरझाई, शराफुद्दीन अश्रफ, मुजीब उर रहमान, फजल हक फारुकी, फरीद अहमद, नवीन उल हक, नूर अहमद, मोहम्मद सलीम, कैस अहमद, गुलबदीन नायब.
Ayushmann Khurrana: ‘2024 मध्ये अनोख्या शैलींचा प्रयोग करणार, अभिनेत्याचा खुलासा म्हणाला…
भारत-अफगाणिस्तान हेड टू हेड रेकॉर्ड
T20 क्रिकेटमध्ये भारत आणि अफगाणिस्तान 5 वेळा आमनेसामने आले आहेत. एक सामना अनिर्णित राहिला. उर्वरित 4 सामने भारताने जिंकले आहेत. भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात प्रथमच द्विपक्षीय टी-20 मालिका खेळवली जाणार आहे. याआधी हे दोघे फक्त टी-20 विश्वचषक आणि आशिया कपमध्ये खेळले होते.
थेट प्रसारण
भारत-अफगाणिस्तान T20 मालिका स्पोर्ट्स 18 नेटवर्कवर थेट प्रसारित केली जाणार आहे. जिओ सिनेमा अॅप आणि वेबसाइटवर T20 मालिकेचे लाईव्ह स्ट्रीमिंग फ्री आहे.
Mukesh Ambani : होय, ‘रिलायन्स’ गुजरातीच; अंबानींनी सांगितला गुजरात विकासाचा रोडमॅप
सामना कधी सुरू होईल?
भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील तीनही टी-20 सामने भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7 वाजता सुरू होतील. नाणेफेक भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 6.30 वाजता होईल.