Ayushmann Khurrana: ‘2024 मध्ये अनोख्या शैलींचा प्रयोग करणार, अभिनेत्याचा खुलासा म्हणाला…
Ayushmann Khurrana : बॉलिवूड (Bollywood) अभिनेता आयुष्मान खुराना (Ayushmann Khurrana) सध्या ‘ड्रीम गर्ल 2’ (Dream Girl 2) या सिनेमामुळे जोरदार चर्चेत आला आहे. आयुष्मान आणि अनन्या पांडे या सिनेमाला चाहत्यांचा चांगला प्रतिसाद मिळाला होता. या सिनेमाने 100 कोटींचा टप्पा देखील पार केला होता. अशातच आता आगामी चित्रपटांबद्दल अत्यंत रोमांचित झाला आहे. अभिनेता लवकरच आगामी सिनेमाची घोषणा केली जाणार असल्याचे सांगितले आहे.
View this post on Instagram
आयुष्मान पुढे म्हणाला की, तो अनेक ‘शैलीं’सह प्रयोग करणार आहे आणि प्रेक्षकांसाठी थिअट्रिकल हीरो म्हणून त्याचा दर्जा मजबूत करणार आहे. मी 2024 मध्ये बर्याच शैलींमध्ये प्रयोग करणार आहे. माझ्या चित्रपटांची स्लेट नेहमीप्रमाणेच खूप वैविध्यपूर्ण असेल आणि ती केवळ प्रेक्षकांना दर्जेदार सिनेमेटिक अनुभव देण्यावर लक्ष केंद्रित करणार आहे. मी सध्या काही मनोरंजक चित्रपट लॉक करत आहे जे संपूर्ण कुटुंबासमवेत थिएटरमध्ये पाहू शकणार आहात.
तो पुढे म्हणाला की, “सामायिक समुदाय पाहण्याचा अनुभव देणे हे एक मनोरंजनकर्ता म्हणून माझे नेहमीच प्राधान्य राहिले आहे. माझ्या चित्रपटांच्या पुढील सेटमध्ये प्रेक्षक म्हणून माझ्या सिनेमा कंटेंटच्या निवडी दिसून येतील. मला चित्रपटगृहात जे चित्रपट बघायचे आहेत ते लक्षात घेऊन मी नेहमीच माझे चित्रपट निवडले आहेत. आयुष्मानकडे आधीच अनेक प्रकल्प आहेत, पण ते उघड करण्यास आणखी थोडा वेळ घेणार असल्याचे त्याने यावेळी सांगितले आहे. कारण या चित्रपटांची स्वतंत्रपणे आणि भव्य पद्धतीने घोषणा करण्याची योजना आहे.
कतरिना कैफच्या मेरी ख्रिसमसमधील ‘रात अकेली थी’ हे गाणं प्रेक्षकांच्या भेटीला
आयुष्मानचा ‘ड्रीम गर्ल 2’ हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर धमाका करत आहे. या सिनेमात आयुष्मानसह अनन्या पांडे महत्वाच्या भूमिकेत आहे. या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर 100 कोटींपेक्षा अधिक कमाई केली आहे. ‘ड्रीम गर्ल 2’ हा सिनेमा, कलाकारांचा अभिनय आणि गाणी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहेत. आता अभिनेत्याची आगामी प्रोजेक्टची प्रेक्षकांना प्रतीक्षा लागली आहे.