Ayushmann Khurrana : आयुष्मान खुरानावर दु:खाचा डोंगर; हृदयविकाराच्या झटक्याने वडिलांचे निधन

  • Written By: Published:
Important Update Regarding Shreyas Iyer Fitness Has Come Out   2023 05 19T160634.970

Ayushmann Khurrana Father Dies: बॉलिवूड अभिनेता आयुष्मान खुरानाचे (Ayushmann Khurrana) वडील पंडीत पी खुराना यांचं निधन झालं आहे. शुक्रवारी(१९ मे) चंदीगढ येथे त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. गेल्या काही दिवसांपासून ते हृदयविकाराच्या आजाराने खूपच त्रस्त होते. त्यांच्यावर चंदीगड येथील रुग्णालयात खूप दिवसापासून उपचार सुरू होते. मात्र उपचारादरम्यान आज सकाळी १०:३० वाजता त्यांची प्राणज्योत मालवली.

 

View this post on Instagram

 

A post shared by prime video IN (@primevideoin)


आयुषमानचा भाऊ अपारशक्ती खुरानाच्या प्रवक्त्यांनी याबाबत अधिकृत माहिती दिली आहे. ‘आयुषमान आणि अपारशक्तीचे वडील पी. खुराना यांचं मोहालीमध्ये शुक्रवारी सकाळी निधन झाले आहे. गेल्या काही दिवसांपासून ते खुपच आजारी होते,’ असं त्यांनी यावेळी म्हणाले आहेत. आयुषमानचं त्याच्या वडिलांशी खूप चांगलं आणि खास नातं होतं.

Adipurush: ‘आदिपुरुष’ चित्रपटाच्या वादात अभिनेता प्रभासच्या पोस्टरनं वेधलं लक्ष

सोशल मीडियावर त्याने वडिलांसाठी एक पोस्ट लिहिली होती. ‘आम्हाला हे सर्व त्यांच्याकडूनच मिळालं. शिस्त, संगीताबद्दलचं प्रेम, कविता, चित्रपट आणि कला. त्यांनी कायद्याचं शिक्षण घेतलं होतं. पण ज्योतिषीमध्ये त्यांना विशेष रस होता. त्यांच्यामुळेच माझ्या नावाच्या स्पेलिंगमध्ये दोन वेळा N आणि R आहे’, असं त्याने लिहिले होतं.

Tags

follow us