Adipurush: ‘आदिपुरुष’ चित्रपटाच्या वादात अभिनेता प्रभासच्या पोस्टरनं वेधलं लक्ष

  • Written By: Published:
Important Update Regarding Shreyas Iyer Fitness Has Come Out   2023 05 16T162539.849

Adipurush: ‘आदिपुरुष’ (Adipurush) हा सिनेमा लवकरच चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी या सिनेमाचा ट्रेलर चाहत्यांच्या भेटीला आला आहे. या ट्रेलरला चाहत्यांनी मोठी पसंती देखील दिली आहे. आता अभिनेता प्रभासने (Prabhas) या सिनेमाचे एक पोस्टर सोशल मीडियावर शेअर केले आहे. या पोस्टने अनेकांचे लक्ष वेधले आहे.

प्रभासने या पोस्टरला खास कॅप्शन देखील दिले आहे. प्रभासने सोशल मीडियावर आदिपुरुष या सिनेमाचे पोस्टर शेअर केले आहे. या पोस्टरला त्याने कॅप्शन दिले आहे. ‘मंगलमय हर भक्त होगा, जब आदिपुरुष का स्वागत होगा, One month to go! जय श्री राम’ पोस्टरमध्ये प्रभासबरोबर देवदत्त नागे (Devdatta Nage) देखील दिसत आहे. प्रभास आदिपुरुष या सिनेमात श्री रामाची भूमिका साकारली आहे, तर देवदत्तनं या सिनेमात हनुमानाची भूमिका साकारली आहे.

प्रभासनं शेअर केलेल्या आदिपुरुष सिनेमाच्या या नव्या पोस्टरला चाहत्यांनी देखील मोठी पसंती दिली आहे. या सिनेमात अभिनेता प्रभास (Actor Prabhas) हा प्रभू श्रीरामांच्या भूमिकेत दिसला आहे, तर अभिनेत्री क्रिती सेनॉन सीतेचे पात्र साकारत आहे. हैदराबादमध्ये ‘आदिपुरुष’ या सिनेमाच्या ट्रेलरचे खास स्क्रीनिंग करण्यात आले होते.

 

View this post on Instagram

 

A post shared by Prabhas (@actorprabhas)


त्यानंतर आता चाहत्यांसाठी या सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला. या ट्रेलरच्या सुरुवातीला हनुमान हा गुहेत तपश्चर्या करत असल्याचे दिसत आहे. त्यानंतर मग श्रीराम, लक्ष्मण हे सीतेसह वनवासात जात असल्याचे देखील दिसून आले आहे. आता हा सिनेमा १६ जून रोजी प्रदर्शित होणार आहे.

Cannes Film Festival 2023 : ‘कान्स फिल्म फेस्टिव्हल’ला आजपासून सुरुवात; ‘या’ अभिनेत्रीचा रेड कार्पेटवर डेब्यू!

‘आदिपुरुष’ या सिनेमाचा टीझर रिलीज झाल्यानंतर हा सिनेमा वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. टीझरमध्ये वापरण्यात आलेल्या व्हीएफएक्सवर जोरदार टीका होत होती. तसेच या सिनेमातील सैफच्या लूकवरूनही वाद निर्माण झाला. अनेकांनी सैफच्या लूकवर प्रश्न चिन्ह उपस्थित केले होते.

Tags

follow us