कतरिना कैफच्या मेरी ख्रिसमसमधील ‘रात अकेली थी’ हे गाणं प्रेक्षकांच्या भेटीला
Merry Christmas Raat Akeli Thi Song Release: अभिनेत्री कतरिना कैफ (Katrina Kaif) आणि विजय सेतुपती (Vijay Sethupathi) स्टारर “मेरी ख्रिसमस” (Merry Christmas Movie) ची हवा सोशल मीडियावर (social media) असताना आज या चित्रपटातील ‘रात अकेली थी’ (Raat Akeli Thi Song ) हे नवीन गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. या नवीन गाण्याच्या रिलीजने चाहत्यांमध्ये आणि संगीत रसिकांमध्ये उत्साहाचा वाढला आहे.
मनमोहक चाल आणि मनमोहक गीतांनी हे गाणे संगीत उद्योगात धुमाकूळ घालत आहे. प्रख्यात संगीत दिग्दर्शक अरीजित सिंह यांनी संगीतबद्ध केलेले ‘रात अकेली थी’ हे गाणं पारंपारिक आणि समकालीन संगीताचा मिलाफ आहे. प्रीतमचा सिग्नेचर टच या गाण्यातून दिसून येतोय. अरीजित सिंह यांनी हे गाणे सुंदर गायले आहे आणि प्रख्यात गीतकार प्रीतम सिंह यांनी हे गाणं लिहिलं आहे.
श्रीराम राघवनच्या “मेरी ख्रिसमस” मधील कतरिना कैफ आणि विजय सेतुपती यांची ऑन-स्क्रीन केमिस्ट्री प्रीतमच्या संगीताने बहरणार आहे.संजय कपूर, विनय पाठक, प्रतिमा काझमी, टिन्नू आनंद, अश्विनी काळसेकर आणि राधिका आपटे यांच्या प्रमुख भूमिका या चित्रपटात बघायला मिळणार असून हा चित्रपट लवकरच चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.
Satyashodhak :उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मागणीला यश; ‘सत्यशोधक’ चित्रपट टॅक्स फ्री
‘मेरी ख्रिसमस’ वेगवेगळ्या सहाय्यक कलाकारांसोबत दोन भाषांमध्ये शूट करण्यात आला आहे. हिंदी आवृत्तीमध्ये संजय कपूर, विनय पाठक, प्रतिमा कन्नन आणि टिनू आनंद यांच्याही भूमिका आहेत. दुसरीकडे राधिका सरथकुमार, षणमुगराजा, केविन जय बाबू आणि राजेश विल्यम्स यांनी तमिळ आवृत्तीत महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. ‘मेरी ख्रिसमस’ 12 जानेवारी 2024 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होण्यासाठी सज्ज होणार आहे.