Vijay Sethupathi: ‘जवान’नंतर विजय झळकणार ‘या’ बड्या सिनेमात; पोस्टर आउट 

Vijay Sethupathi: ‘जवान’नंतर विजय झळकणार ‘या’ बड्या सिनेमात; पोस्टर आउट 

Vijay Sethupathi upcoming movie: सध्या सोशल मीडियावर (Social media) विजयच्या या ५०व्या सिनेमाची चांगलीच चर्चा रंगत आहे. दाक्षिणात्य सुपरस्टार अभिनेता विजय सेतुपती (Vijay Sethupathi) हा कायम त्यांच्या आगामी सिनेमामुळे जोरदार चर्चेत असतो. त्याचा ‘जवान’ हा सिनेमा सध्या बॉक्स ऑफिसवर जोरदार कमाई करत असल्याचे बघायला मिळत आहे. या सिनेमासाठी विजयने तगडे मानधन देखील घेतले आहे. तसेच आता विजयचा ‘महाराजा’ हा सिनेमा चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमाचे पोस्टर नुकताच प्रदर्शित करण्यात आला आहे.

विजयने सोशल मीडियावर त्याच्या ५०व्या सिनेमाचे पोस्टर शेअर केले आहे. या सिनेमाचे नाव महाराजा असून पोस्टरवर विजयचा हटके अंदाजात  लूक दिसत आहे. त्याच्या हातामध्ये रक्ताने भरलेला कोयता बघायला मिळत आहे. तसेच कानाला काही तरी दुखापत झाल्याचे दिसत आहे. विजय अतिशय साध्या अंदाजात दिसत आहे. तसेच त्याच्या पाठीमागे काही पोलीस अधिकारी उभे असल्याचे बघायला मिळत आहे. एकंदरीत हे पोस्टर सिनेमाबद्दल उत्सुकता वाढवत असल्याचे दिसत आहे.

विजयने त्याच्या ट्विटर अकाऊटंवर महाराजा सिनेमाचे पहिले पोस्टर शेअर करत ‘महाराजा सिनेमातील पहिला लूक’ असे कॅप्शन दिले आहे. त्याचबरोबर हॅशटॅगचा वापर करत हा त्याचा ५०वा सिनेमा असल्याचे सांगितले जात आहे. ‘महाराजा’ सिनेमाबद्दल सांगायचं झालं तर अनुराग कश्यप, ममता महोनदास आणि नट्टी नटराज हे या सिनेमात मुख्य भूमिकेमध्ये दिसणार आहे. निथिलन स्विमीनाथन यांनी या सिनेमाचे दिग्दर्शन केले आहे. आता या सिनेमाच फर्स्ट लूक सध्या समोर आल्याने चाहत्यांमध्ये उत्सुकता बघायला मिळत आहे.

Welcome To The Jungle: ब्रेकअपनंतर पहिल्यांदाच रुपेरी पडद्यावर एकत्र; खिलाडी अन् रवीना टंडन!

विजयच्या ‘जवान’ सिनेमाबद्दल अभिनेता किंग खान आणि अभिनेत्री नयनतारा महत्त्वाच्या भूमिका आहेत. या सिनेमातील विजयच्या भूमिकेने सर्वांचे लक्ष वेधले आहे. या सिनेमासाठी त्याने २१ कोटी रुपये तगड मानधन घेतले आहे. हा सिनेमा नक्कीच बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालणार असल्याची चर्चा सध्या सुरु झाली आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube