Katrina Kaif अन् विकी कौशलच्या ‘मेरी क्रिसमस’ची रिलीज डेट पुन्हा लांबणीवर ; ‘या’ दिवशी होणार प्रदर्शित

Katrina Kaif अन् विकी कौशलच्या ‘मेरी क्रिसमस’ची रिलीज डेट पुन्हा लांबणीवर ; ‘या’ दिवशी होणार प्रदर्शित

Merry Christmas New Release Date : दाक्षिणात्य सुपरस्टार विजय सेतुपती (Vijay Sethupathi) आणि बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफ (Katrina Kaif) काही दिवसांपासून जोरदार चर्चेत आहेत, त्यांच्या आगामी ‘मेरी क्रिसमस’ (Merry Christmas) या सिनेमामुळे लवकरच हा सिनेमा चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. मात्र आता या सिनेमाची प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्यात आली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Taran Adarsh (@taranadarsh)


‘मेरी क्रिसमस’ या सिनेमाची प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्यात आली आहे. ‘मेरी क्रिसमस’ हा सिनेमा अगोदर 15 डिसेंबर दिवशी चाहत्यांच्या भेटीला येणार होता. परंतु नंतर या सिनेमाची प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्यात आली आहे. 8 डिसेंबर दिवशी हा सिनेमा प्रदर्शित होणार असल्याची माहिती समोर आली होती. मात्र आता पुन्हा या सिनेमाची प्रदर्शनाची तारीख बदलण्यात आली. कतरिना कैफ आणि विजय सेतुपती यांचा ‘मेरी क्रिसमस’ हा सिनेमा सध्या जोरदार असल्याचे बघायला मिळत आहे. सध्या या सिनेमाच्या प्रदर्शनाची तारीख बदलण्यात आली आहे.

आता या सिनेमासाठी चाहत्यांना आणखी काही दिवस प्रतीक्षा करावी लागणार आहे. कतरिना आणि विजय यांचा ‘मेरी क्रिसम हा सिनेमा 8 डिसेंबर दिवशी नव्हे तर 2024 च्या जानेवारीमध्ये प्रदर्शित होणार असल्याची माहिती समोर आली. 12 जानेवारी 2024 दिवशी हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे. विजय सेतुपती आणि कतरिना कैफच्या ‘मेरी क्रिसमस’ या सिनेमाची सध्या जोरदार टक्कर आता दीपिका पादुकोण आणि हृतिक रोशनच्या ‘फायटर’ या सिनेमाबरोबर होणार आहे.

Dilip Prabhavalkar: दिलीप प्रभावळकर यांना मृदगंध जीवनगौरव पुरस्कार जाहीर

दीपिका आणि हृतिकचा ‘फायटर’ हा सिनेमा 2024 च्या जानेवारी महिन्यात चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. यामुळे बॉक्स ऑफिसवर या दोन्ही सिनेमांची आता जोरदार टक्कर बघायला मिळणार आहे. बॉलिवूड अभिनेत्री कतरिना देखील सध्या जोरदार चर्चेत आहे. तिचा ‘टायगर 3’ (Tiger 3) हा सिनेमा चाहत्यांच्या भेटीला आला आहे. या सिनेमात ती बॉलिवूडचा भाईजानसोबत (Salman Khan) अॅक्शन करत असल्याचे बघायला मिळत आहे. इमरान हाशमी देखील या सिनेमात नकारात्मक भूमिका साकारला आहे. तसेच किंग खानची झलक देखील या सिनेमात बघायला मिळत आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube