Dilip Prabhavalkar: दिलीप प्रभावळकर यांना मृदगंध जीवनगौरव पुरस्कार जाहीर

Dilip Prabhavalkar: दिलीप प्रभावळकर यांना मृदगंध जीवनगौरव पुरस्कार जाहीर

Dilip Prabhavalkar Mrudgandh Jivangaurav: विठ्ठल उमप फाऊंडेशन तर्फे देण्यात येणाऱ्या मानाच्या ‘मृदगंध पुरस्कारा’ची (Mrudgandh Jivangaura Award) घोषणा नुकतीच पत्रकार परिषदेत फाऊंडेशनचे अध्यक्ष नंदेश विठ्ठल उमप यांनी केली आहे. ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर (Dilip Prabhavalkar) यांना यंदाचा ‘मृदगंध जीवनगौरव पुरस्कार’ जाहीर करण्यात आला आहे. यंदाचा 13 वा लोकशाहीर विठ्ठल उमप स्मृती संगीत समारोह व विठ्ठल उमप फाऊंडेशनचा ‘मृदगंध पुरस्कार’ वितरणाचा भव्य सोहळा येत्या 26 नोव्हेंबर दिवशी काशिनाथ घाणेकर सभागृह, ठाणे येथे सायंकाळी संपन्न होणार आहे.

सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक क्षेत्रातील प्रतिष्ठित व्यक्तींना ‘मृदगंध पुरस्कार’ देण्यात येत असतो. सुदेश भोसले (संगीत विभाग), आतांबर शिरढोणकर (लोकसंगीत), अनुराधा भोसले (सामाजिक कार्य), सुमित राघवन (अभिनय क्षेत्र), चिन्मयी सुमित (अभिनय क्षेत्र), केतकी माटेगावकर (नवोन्मेष) या मान्यवरांना ही या सोहळ्यात गौरविण्यात येणार असल्याची माहिती सॆन्यात आली आहे.

या सोहळ्याला मुख्य अतिथी म्हणून राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, नीलम गोऱ्हे, उदय सामंत, अ‍ॅड आशिष शेलार, अशोक शिनगारे, अभिजीत बांगर, संदीप माळवी आदी मान्यवर मंडळी मुख्य पाहुणे म्हणून आपली हजेरी लावणार आहेत. डॉ.सलील कुलकर्णी आणि संदीप खरे यांचा ‘आयुष्यावर बोलू काही’ हा कवितांचा विशेष कार्यक्रम या सोहळ्यात संपन्न होणार असल्याची माहिती दिली आहे. शाहीर बापू जाधव यांच्या लोककला शाहिरीचा तसेच खुशाबा यांच्या आदिवासी नृत्याचा आस्वादही प्रेक्षकांना या सोहळ्यादरम्यान बघायला मिळणार आहे.

Aapan Yana Pahilt Ka: विजय केंकरे दिग्दर्शित ‘आपण यांना पाहिलंत का?’ लवकरच रंगभूमीवर

बाबांनी लोककलेसाठी आपलं आयुष्य वेचलं. जेव्हा ते रंगमंचावर उभे राहायचे तेव्हा एक ‘चैतन्य’ संचारायचं. याच ‘चैतन्या’चा शोध घेत अनेक वेगवेगळ्या क्षेत्रात आपलं बहुमूल्य योगदान देणाऱ्या मान्यवरांचा सत्कार करणे आमच्यासाठी अभिमानाची गोष्ट असल्याचे गायक नंदेश उमप यांनी यावेळी सांगितले.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube