Aapan Yana Pahilt Ka: विजय केंकरे दिग्दर्शित ‘आपण यांना पाहिलंत का?’ लवकरच रंगभूमीवर

Aapan Yana Pahilt Ka: विजय केंकरे दिग्दर्शित ‘आपण यांना पाहिलंत का?’ लवकरच रंगभूमीवर

Aapan Yana Pahilt Ka : अभिनेत्री मधुरा वेलणकर-साटम (Madhura Velankar Satum) आणि अभिनेते तुषार दळवी (Tusshar Dalvi) मराठी व्यावसायिक रंगभूमीवर पुन्हा एकदा पुनरागमन करत आहेत. (Marathi Drama ) विजय केंकरे दिग्दर्शित ‘आपण यांना पाहिलंत का?’ (Aapan Yana Pahilt Ka ) या नव्याकोऱ्या नाटकात मधुरा आणि तुषार मुख्य भूमिकेमध्ये दिसणार आहेत.

वरदा-वैध निर्मित प्रवेश प्रकाशित या मराठी नाटकाची निर्मिती आदिती देवेंद्र राव, वैशाली धनेश पोतदार यांनी केली आहे. सुशील स्वामी यांनी या मराठी नाटकाचं लेखन केलं आहे. आपल्या सुखी संसाराला कोणाची दृष्ट लागू नये असं चाळीशीच्या उंबरठ्यावर असणाऱ्या जोडप्याला वाटत असतं. संसारात एकत्र आहोत म्हणजे सगळं शांत आणि निवांत. असं खरच असतं? अश्यातच अचानकपणे त्यांच्या आयुष्यात आणि घरात एक अनोखं वादळ प्रवेश करतं.

या मोठ्या वादळाच्या येण्यानं त्या जोडप्याच्या नात्याचं, त्यांच्या संसाराचं काय होतं? याची नर्म विनोदी गोष्ट ‘आपण यांना पाहिलंत का?’ या मराठी नाटकाद्वारे आपल्या अनुभवास येणार आहे. तुषार दळवी आणि मधुरा वेलणकर साटम यांच्यासह विक्रम गायकवाड, श्रुती पाटील यांच्या या नाटकात मुख्य भूमिकेत बघायला मिळणार आहेत. अजित परब यांनी नाटकाचं संगीत, शीतल तळपदे यांनी प्रकाश योजना, मंगल केंकरे यांनी वेशभूषा, संदेश बेंद्रे यांनी नेपथ्याची जबाबदारी घेतली आहे.

‘तुम्ही कधी भांडी घासली आहेत का?’ स्पर्धकाच्या सवालावर बिग बीं यांचा मोठा खुलासा

ज्येष्ठ दिग्दर्शक विजय केंकरे यांनी पती-पत्नीच्या अनोख्या नात्याचा वेध घेणारी अनेक नाटकं दिग्दर्शित केली आहेत. कसदार दिग्दर्शनातून नेमक्या पद्धतीनं आजच्या काळावर ते नाटकातून खुलासा करतात. आता तुषार दळवी, मधुरा वेलणकर साटम, विक्रम गायकवाड, श्रुती पाटील यांच्यासारख्या कसलेल्या दमदार कलाकारांना घेऊन ‘आपण यांना पाहिलंत का?’ या नाटकात विजय केंकरे मराठी नाट्यप्रेमींना काय नवीन अनुभव देणार याची मोठी उत्सुकता लागली आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube